Category: Marathi kaavya

  • सुंदरता – SUNDARTAA (BEAUTY)

    मोर नाचतो नाचनाचतो भूमीवरती राजहंस पण जळी विहरतो भूमीवरती राजहंस वा मोर असूदे जीवच दोघे सुंदरतेला जीव जाणतो भूमीवरती

  • मयुरवाहिनी – MAYUR VAAHINEE ( ONE WHO RIDES A PEACOCK)

    मयुरवाहिनी सरस्वती शारदा सुंदरी मयुरवाहिनी वीणा पुस्तक शीलधारिणी मयुरवाहिनी मोरपिसांच्या पिंछीचा मृदु स्पर्श मुलायम जागवितो तव सयी अंतरी मयुरवाहिनी काळ्या कोऱ्या पाटीवरती नऊ रसांच्या रेषा तोलत उभी लेखणी मयुरवाहिनी जललहरींचे वसन धवल घन दले गुलाबी कंच पाचु तनु मनगट हळदी मयुरवाहिनी चित्र रेखुनी फुलवेलीचे रंगबिरंगी कलम टेकवुन उभी पद्मश्री मयुरवाहिनी करात नाजुक स्फटिक मण्यांची माला…

  • अंगठा – ANGTHAA (THUMB)

    अंगठा… हिरवी पाने पसाभर आत्महिताचा वसा वर शक्य झाल्यास सहज तू भ्रष्ट राज्य खालसा कर परत परत पाड नाणी रिक्त झालाय कसा तर गुंफुन सयी बकुळ फुले घाल गळा छानसा सर आयुष्याचं सोनं झालं जपत अंगठा ठसा धर

  • माझे मुली – MAAZE MULEE (MY DAUGHTER )

    हवेप्रमाणे अवतीभवती सदैव माझ्या असतेस तू… दूर कुठे इथेच घरभर रंग उधळित असतेस तू… मुक्तछंद झऱ्यासारखी खळाळत वाहत रहा … तुझा आनंद जाशील तिथे मुक्त मुक्त उधळत राहा .. … माझे मुली सांग तुला काय देऊ… माझ्याकडून … आज भेट… तूच दिलास तुझ्या रुपात.. अनमोल ठेवा भेट… तुझा जन्म तुझा आहे .. तुझ्यासाठी जगत रहा…

  • फापटपसारा – FAAPAT PASARAA (MESS)

    कवीच्या जाण्याचे दुःख .. कवी नावाच्या संवेदनशील हृदयाला होतच असते… कारण… त्याच संवेदनशीलतेने… त्यानेही टिपलेली असतात … हळुवार मनाची स्पंदने…….. कधी हाताच्या बोटांची थरथर… कधी पूर्ण अंगावर अचानक उठलेले शहारे …. बोलत असतात…. त्याच्याच भाषेतून…. ती भाषा…. कुठल्याही पुस्तकात वाचून शिकता येत नाही…. त्या भाषेला व्याकरण नसतं … फक्त भाव असतो…. ते अनुभवत कवीचं हृदय…

  • हुमान – HUMAAN(PUZZLE)

    कोडे कसले हुमान हे तर माझ्यामधले इमान हे तर गगन भरारी घडवायाला दारी आले विमान हे तर लपवुन काही कशास ठेवे मला दावते गुमान हे तर मन माझे मज मुक्त सोडते करे न कधी अनमान हे तर भरून माझ्या अंतरात रे सदैव राखुन मान हे तर अश्रू नेत्रांमधून गाळू काम करूया किमान हे तर सामानावर…

  • ऑथर – AUTHOR

    घडा पूर्ण घडवून पॉटर गडे भरायास आलाय वॉटर गडे गझल जाहली आज टॉपर गडे कळे अंतरातील पॉवर गडे पुरे काफिये हे मिरवणे गडे नवा घेच बँकेत लॉकर गडे लिहायास झाले कलम मोकळे खरी जाहले बेस्ट ऑथर गडे कशाला विळ्या अन सुऱ्यांचा जथा मिळे सांबरायास चॉपर गडे सुळसुळाट मोबाइलांचा जिथे उभा रेंज मिळण्यास टॉवर गडे धरेवर…