Category: Marathi kaavya

  • भूमीताय – BHUMEE TAAY

    भूमीताय दिस उजाडल्यापासून तापू लागते. ढग पांढरे तपास बसलेत.एप्रिल आला. चैत्र येतोय. कोसळारे ढगांनो…. कुणाची ताय आहे ती कुणाची आय आहे ती घाल या माहात न्हाऊ तापली बाय आहे ती ….

  • गोडवे – GODAVE

    प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे.. असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे… झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम.. यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…

  • गा गा शेरा – GAA GAA SHERAA

    पानगळीने झाड बहरते शिशिरानंतर.. शिशिरानंतर… वसंत येता पुन्हा लहरते फुलल्यानंतर.. शिशिरानंतर… ग्रीष्मानंतर वर्षा येते धरा भिजविण्या बी अंकुरण्या.. भिजते खुलते जमीन बीजे रुजल्यानंतर.. शिशिरानंतर… शरदचांदणे हेमंताची शाल सुनहरी निळ्या अंबरी पांघरून मन हृदय सजावे भरल्यानंतर.. शिशिरानंतर… कागद कोरा त्यावर कशिदा विणता भरता गात लेखणी.. ऊन सोसते घाम गाळते शरदानंतर.. शिशिरानंतर… बिंब हलतसे पाण्यामधले थरथर त्याची…

  • सुनहरी – SUNHAREE

    पानगळीने झाड बहरते शिशिरानंतर… वसंत येता पुन्हा लहरते.. शिशिरानंतर… ग्रीष्मानंतर वर्षा येते धरा भिजविण्या…. शरद चांदणे हेमंतची शाल सुनहरी… पांघरून मन हृदय सजावे शिशिरानंतर…..

  • टाळी – TAALHEE

    डोळ्यांत आसवांची आली भरून घागर अन पापण्यांत स्वप्ने बुडली झरून घागर भरुनी पुन्हा पुन्हा ती करते रिती स्वतःला झाल्यावरी रिकामी येते तरून घागर पश्चिम झळाळणारी तांब्यापरी बघूनी मज माय पाठवीते छोटी घरून घागर मम घागरीत सागर आहे मधुर जलाचा मी रम्य घाट चाले डोई धरून घागर घन तापताप तपुनी देता विजेस टाळी सांजेस मेघमाला ओते…

  • सज्ज – SAJJA

    सांजवेळ रम्य होत लाल भाळ जाहले भारतीय भू स वंदण्यास काळ जाहले भाळ काळ जाहलेय नमविण्यास शत्रुला कूट प्रश्न उलगडून मी गव्हाळ जाहले कंटकांस खात खात वर्तमान पचवुनी स्वागतास सज्ज शुभ्र पुष्पमाळ जाहले मौन घेतले जरी तयास आज त्यागुनी जाळण्यास वाजण्यास जाळ टाळ जाहले रंगरूप आरशात पाहताच रंगले रंगरंगुनी नशेत सान बाळ जाहले

  • काव्यगंगा – KAAVYA GANGAA

    निळा रंग आभाळाचा मनात जेव्हा उतरत जातो.. नयनांमधल्या निळ्या डोहात हळूहळू पसरत जातो पंख पसरून मुक्त पाखरे झेप घेतात नभात जेव्हा मन गाणे गात गात हिंदोळ्यावर झुलते तेव्हा हिंदोळ्यावर झुलता झुलता तरल होऊन शब्द काही नकळत अर्थ देऊन जाती देहबोलीला दिशात दाही डोळे बोलतात अधर विलगतात शब्दांमधला पकडून भाव तरल धुक्याच्या पडद्याआडून हाका मारतो अनाम…