Category: Marathi kaavya

  • माझी तरही – MAAZEE TARAHEE

    तरही तरिही तरली तरली गझलियतीने चढली तरली माझी तरही लाख गुणाची जरी तरकली टिकली तरली उले आणखी मिसरे सानी गुंफुन तरही बनली तरली फुले पाखरे पर्णरुपातुन तरही कशिद्यावरली तरली तरहीमधुनी हसत सुनेत्रा झुल्यावरती झुलली तरली

  • वर्दी – VARDEE

    अजून माझ्या निळ्या कपाटी वर्दी खाकी आहे करी कायदा घेण्याची मम इच्छा बाकी आहे वेग कशाला फुका वाढवू जाईन आरामात दो पायांची माझी गाडी चौदा चाकी आहे फिरविन लाठी वीजेसम मी कोसळण्या ढग हट्टी कातळ काळ्या दंडी माझ्या बिल्ला वाकी आहे अर्धा प्याला कसा भरू मी कधी न चिंता केली भरून प्याला देण्या जवळी प्रतिभा…

  • प्याली – PYAALEE

    प्याले भरून प्याली ओठी धरून प्याली बिंबास कांचपात्री बघते झुकून प्याली न्हाऊन सप्तरंगी माझी तरूण प्याली लाखो जिने बिलोरी आली चढून प्याली गझलेत पेय उसळे फेसाळत्या नशेचे गाठूनिया तळाला आली तरून प्याली केले जरी रिकामे फटक्यात रांजणाला त्याला पुन्हा भराया अजुनी टिकून प्याली नसता कुणी पहाया मस्तीमधे स्वतःच्या नेत्रात दो शराबी जाते बुडून प्याली मातीत…

  • शेतकरी मन – SHETAKAREE MAN

    शेतकरी मन प्रसन्न व्हाया लेझिम खेळावे शेरांनी भूमी देते गुरांस चारा तिजला वंदावे शेरांनी निर्भरतेने व्यक्त व्हावया काव्यफुलांचे मळे बहरण्या मुळापासुनी बदल हवा तर स्वतःस घडवावे शेरांनी चपखल बसण्या शब्द नेमके वृत्त असावे मम वृत्तासम वृत्ती निर्मल मम म्हणण्या मग मुळी न लाजावे शेरांनी गूढ कसे हे मज समजावे कळल्याविन मी कसे वळावे पुरे जाहला…

  • मुरलीचे स्वर – MURALEECHE SWAR

    अहह ! अहह ! आषाढ घनांतुन कृष्ण नीळ तन मन जलदांतुन शकुन्तलेचे कुंतल श्यामल बरस बरसती झरझर भूवर कुरळ कुरळ कचभार प्रियेचा उडवत जाता झोत हवेचा कालिंदीच्या सलील जलावर हिंदकळे राधेची घागर पाझरणाऱ्या त्या सलिलावर मुरलीचे स्वर… मुरलीचे स्वर….

  • बरस बरसला दारी – BARAS BARASALAA DAAREE

    तरही कविता कवितेची पहिली ओळ कवी रमेश वाकनीस यांची मी कोसळणारा पाऊस पहिलावहिला अंतरी भरूनी हलके झरझरणारा आषाढ घनातुन संदेश प्रिये तुज देण्या मी येतो तुझिया नयनांत भराया वारा पाऊस थबकला बरस बरसला दारी मेघातुन आला लोळण घेण्या दारी अक्षरे पेरुनी भूवर मम अंगणी तो हसतो आहे हिरवेपण लेऊनी पानांचा पाऊस टपटपे भिजे माधवी पान…

  • हूड बाळ – HOOD BAAL

    खडकांतुन उडत झरत निर्झर ये गीत गात जायचे तया खुशीत करित रम्य नृत्य नाच वळणावर घेत उड्या पर्वतास भेट खड्या सखाच हा तुझा कड्या कड्यास साद हसत देत बिजलीसम लखलखत निर्झर ये गात गात …. वाटेवर पोरधरी मिळवतील हात जरी सान पोर समजुनी पकडतील जर कुणी त्यांस जळी पाडूनी झरा शिरे दाट वनी जोरदार धडक…