Category: Marathi kaavya

  • वावटळ – VAAVTAL (WHIRLWIND)

    हलधर फिरवे हल शेतातिल मातीमधुनी हलके हलके करत मोकळे मातीतिल कण अंतरातुनी हलकेहलके मेघ वर्षती आभाळातुन बिजलीसंगे बोलत नाचत भिजे वावटळ वळिवामधली धार प्राशुनी हलकेहलके

  • पदावर्त – PADAAVART (SQUARE FOOT)

    पायाने जे उडवे पाणी त्या यंत्राला पदावर्त म्हणती अटीविना जे प्रेम करू वा कर्म करू ते विनाशर्त म्हणती दामाविन जी वाटसरूंना जल पाजे ती खरी पाणपोई भुकेजल्यांचे उदर प्रसादे तृप्त करे त्या सदावर्त म्हणती

  • क्षत्राणी – KSHATRAANEE (COURAGEOUS WOMAN)

    नित्य प्राशिते जिनवाणी मी कधी न गाते रडगाणी मी छिंद छिंद अन भिंद भिंद तो क्रोध करूया तू आणी मी घरात परिमल पसरवणारी मेजावरली फुलदाणी मी कडेकपारीतून वाहते शीतल खळखळते पाणी मी ईश्वर म्हणतो, हृदयी काष्ठी जळी स्थळी अन पाषाणी मी करकर करते पायताण मम म्हणून चाले अनवाणी मी काव्यकोंदणी लखलखणारी अक्षररूपी गुणखाणी मी टंकसाळ…

  • नांगर – NAANGAR (A PLOW)

    आयुष्याची माती केली तूच स्वतः कबूल कर ही खुल्या मनाने चूक अता गच्च ढेकळे घट्ट जाहली वाळुनी ग कुणी फोडली फिरवुन नांगर जाण अता

  • कताई – KATAAEE (SPINNING)

    समुदायाने सूतकताई करे शांतीचा दूत कताई भुंकत कुत्रे कुठे निघाले जिथे करे रे भूत कताई हत्ती पाळावया पोसण्या करे रोज माहूत कताई चरखा फिरवुन सहजपणाने शिकवे करण्या पूत कताई हडळ स्मशानी बसून करते वस्त्रे नेसुन धूत कताई चरख्याचे भांडार भराया आला तुजला ऊत कताई

  • माती – MAATEE (SOIL)

    तापुनी आक्रन्दतेना फक्त सोसे तप्त लाव्हा मूक माती मृत्तिका मूर्ती क्षमेची फाटते पण धरत नाही डूक माती का क्षमेची नाटकेही चाललेली माणसांची या धरेवर ती निसर्गा बांधलेली माणसासम ना करे हो चूक माती

  • सुतक – SUTAK (PERIOD OF MOUNING)

    पाळते ना सुतक ताई बोलते बेधडक ताई ढोंग जेथे त्या तिथूनी निघुन येते तडक ताई सत्य शोधाया कळाया यत्न करते अथक ताई घाम गाळुन चिंब भिजवे तापलेली सडक ताई काल जी होती मुलायम आज झाली कडक ताई