Category: Marathi kaavya

  • अहाहा! – AHAAHAA! (OHO HO!)

    तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी निशिकांत देशपांडे यांची मनमोकळे करावे कोणापुढे कळेना सारेच ऐकवीती श्रोता कुठे दिसेना कुंडीतल्या तरूवर लिहिल्या उदंड गझला जाऊ कुठे विकाया बाजारही भरेना वेलीवरी फुलांच्या गर्दीत मूक पाने जो तो म्हणे अहाहा ! कोणी फुले खुडेना हे काफिये गझलचे असुदेत तंग ढगळे टाळूनिया तयांना लिहिणे मला जमेना पंचेंद्रिये झरोके करण्यास…

  • फळकुटे – FALHAKUTE (WOODEN PLANKS)

    शहरगावी सून आली राहण्या एक खोली मून झाली राहण्या घासलेटी स्टोव्ह होता रांधण्या सोबतीला जून पाली राहण्या घासुनी फरशीस देण्या चारुता गुणगुणे ती धून चाली राहण्या ओसरी नव्हतीच नव्हते स्नानघर फळकुटे जोडून न्हाली राहण्या शेत नाही तिज स्वतःचे राबण्या राबतेय विणून शाली राहण्या पाठ छहढालास करुनी आज तू आणल्या जिंकून ढाली राहण्या लागला लग्गा कुणा सट्ट्यावरी…

  • चिंधी संधी – CHINDHEE SANDHEE (PETTY CHANCE)

    चिंधी संधी….. (दोन मुक्तके) मला हवी तर मिळेल मजला संधी बिंधी कशास बांधू जखमेवरती चिंधी बिंधी रक्त सांडुदे म्हणून करते कानाडोळा तुला वाटते तशी न मी रे अंधी बिंधी … इच्छा आहे जगावयाची म्हणून मी या जगती आहे मरेन केव्हातरी पुढे मी तुजसाठी पण संधी आहे मरावयाची असली चिंधी संधी मजला नकोच आहे इच्छेविन मज मारायाची…

  • ठाणे – THAANE (STATION)

    पुण्यनगरी प्रिय जिवांची मिथ्य शक्तीचे न ठाणे आवडे आत्म्यात मजला बिंब माझे मी पहाणे उमलती काव्यात माझ्या अंतरीची भावपुष्पे तोंडच्या वाफेवरी ना धावते मम मुक्त गाणे बोलते बेधडक तरीही दुखविले ना व्यर्थ कोणा बोलण्याचे टाळण्याचे धुंडते ना मी बहाणे बाष्प पापातिल जलाचे दाटते मेघात जेव्हा लोळुनी झिंगून पिंगुन बरळतो वारा तराणे टिपुन घेती चिवचिवाटा नेत्र…

  • तीर्थंकरा – TEERTHANKARAA (SUPREME LORD)

    पंचकल्याणिक कुणाचे बोल रे तीर्थंकरा इंद्रियांचे की जिवाचे सांग रे तीर्थंकरा गणधरांनी संप केला बैसले ध्यानात ते समवशरणच ओस पडले ऊठ रे तीर्थंकरा शस्त्रधारी भक्त येता मौन शासनदेवता मौन त्यांचे सुटत नाही वाच रे तीर्थंकरा ठासलेल्या लेखण्या या मायभूच्या रक्षणा तूच आता चाप त्यांचा ओढ रे तीर्थंकरा पंचभूते भडकलेली उदक नाही औषधा अर्घ्य तुज देण्यास…

  • मंत्र – MANTRA (SPELL)

    अक्षर बीजांमधुनी उमटता मंत्र हृदय मंदिरी हवे कशाला कर्मकांड अन तंत्र हृदय मंदिरी जरी मोजुनी मात्रा लगक्रम यंत्री भरला तरी विशुद्ध भावांविन ना चाले यंत्र हृदय मंदिरी

  • त्र्यंगुल – TRYANGUL (THREE FINGERS WIDE)

    गाठायाला हवीहवीशी मंजिल बाई..नोटांचे मज लागत नाही बंडल बाई… सुयोग्य व्यक्तिला मत दे तू अचल मनाने..नकोस झुलवू मनास अपुल्या चंचल बाई… पाचोळ्याने भरून गेले जंगल बाई..कूडा कचरा गोळा करते त्र्यंगुल बाई… शेर असूदे पाच सहा वा सतराशेही..त्यांची चाले गझलेमधुनी दंगल बाई… घरात सखये वीज न आली कोसळली ती..माळ्यावरचा घेच पुसाया कंदिल बाई… अर्थ किती तू…