-
वळण – VALAN (TURNING)
वळण जरी नसे तरी हट्टाने वळणारच वळण्यातिल घेत मजा मजला मी छळणारच पोहचून आधी मी वाट तुझी बघणारच वाटेवर अडुन तुझ्या पुन्हा मधे बसणारच नीर भरत डबा भरत भाव सहज भरणारच मोजत ना मात्रा मी गुणगुणुनी लिहिणारच कला मला अवगत रे जगण्याची वळण्याची नियतीवर विसंबणे मजला ना रुचणारच काय कुठे बिघडलेय सारे जग मस्त मस्त…
-
भरती – BHARATEE (TIDE)
अलवार भावनांना तुडवू नकोस आता शब्दांस ठोकुनीया घडवू नकोस आता खिडकीत लोचनांच्या पाऊस दाटलेला म्हणतो मला पडूदे अडवू नकोस आता भिजवून मृण्मयीला मृदगंध वाहु द्यावा कोंडून तप्त वाफा रडवू नकोस आता चाफ्यासमान प्रीती माझीच माझियावर दरवळ तिचा सुगंधी दडवू नकोस आता उठतात का शहारे पानांवरी वहीच्या पानांवरी फवारे उडवू नकोस आता गोंजार भावनांना बाळे जणू…
-
उतू गेले – UTOO GELE (OVERFLOWED)
-
शेजारी – SHEJAAREE (NEIGHBORS)
काया शेजारी आत्म्याची कायेवरती रुसू नको मोक्षासाठी शरीर साधन काम सोडुनी बसू नको नको विसंबू दुसऱ्यावरती स्वतः स्वतःला घडवित जा रत्नत्रय झळकण्या अंतरी मिथ्यात्वाने फसू नको जगण्यावरती प्रेम करावे जगास मिथ्या म्हणू नये म्हणशिल जर का जगास मिथ्या जगती पुन्हा दिसू नको ओळखून शक्तीस आपुल्या जप तप कर्मे करत रहा चूक स्वतःची जया न कळते…
-
थट्टा – THATTAA (DIDO)
शौच म्हणा वा शुचिता मजला स्वच्छ राहूदे फक्त मला वक्रपणा जर ना सोडे मी शिक्षा व्हावी सक्त मला भरून प्याले ओतुन प्याले करण्यासाठी रिक्त मला अता व्हायचे भूमीसाठी कोसळणारा हस्त मला मस्त दुपारी स्वस्थ झोपते कसे म्हणू रे सुस्त मला संगणकाची साथ कराग्रां होण्यासाठी व्यक्त मला जरी भावते थट्टा तुजला धर्म शोध तू त्यात खरा…
-
मधली फळी – MADHLI FALEE (MIDDLE TIER)
मारू नको फुलाला म्हणते कळी मुक्याने तोडून काचणारी पर साखळी नव्याने तू ओरडून तेव्हा केला किती तमाशा आता कशास देशी प्राणी बळी मुक्याने वाढून भरभरूनी रसदार लाल भाजी चमच्यांस पाक गोष्टी सांगे पळी मुक्याने फुकटात पाजणारे मधल्यांस डोस येता प्राशून डोस पिचली मधली फळी मुक्याने पाण्यात पोहुनीया येता वरी सुनेत्रा जाऊन गाळमाती बसली तळी मुक्याने
-
मंत्र साखरी – MANTR SAAKHAREE (CHANTS MIXED WITH MELODY)
उडती फुलपाखरे मजेने पंख पसरुनी अवतीभवती फुलाफुलांतिल मकरंदासव गंध उधळुनी अवतीभवती सानथोर जीवांनी साऱ्या सुगंध प्यावा आनंदाने सृष्टी जपण्या मंत्र साखरी जपत रहावा आनंदाने झिंगुन वाऱ्याने लोळावे तृणपात्यांच्या अंगांगावर गवतफुलांनी नाचत गावे तृणपात्यांच्या अंगांगावर मोरपिसाचे कलम सरसरा उखडत जाते भयास जर्जर अक्षररूपी ठिणगी जाळे अंधरुढींच्या भुतास जर्जर असे लिहावे तसे लिहावे नकाच सांगू मला कुणीहो…