Category: Marathi kaavya

  • उदो उदो – UDO UDO (FLATTERY)

    इकडे तिकडे वरती खाली फक्त स्वतःचा उदो उदो दडून मी पण करते आहे मस्त स्वतःचा उदो उदो उदे उदे मी उदे उदे तू उदे उदे घन करिताती गर्जत वर्षत होण्यासाठी स्वस्त स्वतःचा उदो उदो वेठी धरण्या वळण लावण्या कीर्ती मिळण्या बरा पडे चुका लपविण्या शासन करण्या सक्त स्वतःचा उदो उदो पुन्हा उगवती पुन्हा तळपती मध्यान्हीच्या…

  • काजळ – KAAJAL (KOHI)

    नागिण कृष्णा चिद्घनचपला लखलखणारी एक गुलछडी निशिगंधेची दरवळणारी मिणमिणत्या पणतीसम तेवत तेल संपता काजळ होण्या कू नयनातिल काजळणारी नयन जलाशय तुडुंब भरता काठ सोडुनी खडकांमधुनी निर्झरबाला खळखळणारी मुक्त व्हावया अधरांमधुनी शीळ घालुनी लहर हवेची श्वासामधुनी सळसळणारी देहाग्नीच्या भट्टीमध्ये तपवुन तापुन हृदयामधल्या शुद्धात्म्यासह झळझळणारी

  • लग्नविधी – LAGNAVIDHEE (MARRIAGE RITUAL)

    लग्नविधीतिल शब्द खटकतो कन्यादान कन्या म्हणजे वस्तू नाही आत्मा जाण हात असावा हातामध्ये कशास गाठ विसरुन ओट्यांची गाठोडी व्हावे गान स्वतंत्रता आत्म्यांची जाणुन द्यावी साथ परंपरेतिल अस्सल जपण्या यावे भान मैत्री प्रीती दोन जिवांची वाढायास कर्तृत्वाने वाढो दोन्ही घरची शान प्रत्यंचा धनुराची ताणुन धरता नेम मुक्तिपथावर ऊर्ध्वगतीने जातो बाण

  • कनक वल्लरी – KANAK VALLARI ( VINE OF GOLD)

    एक कांचनी क्लीप झळाळे एक सुवर्ण सुदीप झळाळे शालूवरती कनक वल्लरी एक अक्षरी टीप झळाळे पेन लाकडी पण सोन्याचे एक त्यावरी नीप झळाळे हेम चंपकी बनी सुगंधी एक जलाचा पीप झळाळे छेडायाला कुंदन तारा एक विजेसम बीप झळाळे

  • जगत – JAGAT (THE WORLD)

    मी गुणगुणते जे गाणे आहे माझे माझ्यातुन उमले ते ते सारे माझे मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा

  • भ्रमर भृंग – BHRAMAR BRUNG (BUMBLEBEE)

    बास वाटते लिहून जाहलेय बोर बोर काफिया पहा किती चकोर मोर चंद्रकोर कमलिनी दलात शांत पहुडलेत चांदण्यात भ्रमर भृंग हे नव्हेत नेत्र हे तुझे टपोर वाट पाहणे पुरे कुणास रोखले न मी परवडेल ना मला सदा तुझ्या जिवास घोर टोक गाठले असे पुढे न वाट कळस घाट घ्यायची अता उडीच कापलेत सर्व दोर काय चोरले…

  • लाटणे – LAATANE (ROLLING DEVICE)

    लाटण्याने जरी लाटले पाहिजे लाटण्याने कधी ठोकले पाहिजे कंटका ज्या सवय टोचण्याची सदा कंटकालाच त्या टोचले पाहिजे जाहले मी स्मृती तरल वाफेपरी व्हावया गार पण गोठले पाहिजे लाटले श्रेय ना फुकट मी कोरडे श्रेय लाटावया भिजविले पाहिजे नाव पुद्गल असे जिंकते ना कधी तूच जीवा अता जिंकले पाहिजे