-
वाईन VAAEEN
चषकात ओतलेले रंगीत पेय आहे दारू नका म्हणू तिज हा शब्द हेय आहे वाईन रंग दिसतो पण ही सुरा नव्हे हो आनंदकंद रमणी मम गझल गेय आहे कर्मे करून जगणे घडणे तुझ्याच हाती करशील कर्म त्याचे तुजलाच श्रेय आहे नावावरून पारख करणे कधी न बरवे कोणास तो गणाधिश कोणा अमेय आहे आत्म्यात देव वसतो नावास…
-
देवनागरी – DEV NAAGAREE
देवनागरी लिपी मराठी माझ्या हाती सुंदर काठी कन्नड हिंदी इंग्रजीतही गरगर फिरते माझी लाठी अवघ्या ब्रह्मांडात फिराया धन शब्दांचे माझ्या गाठी चिरतारुण्याचा वर मजला उलटूदे पन्नाशी साठी भिऊ कशाला बोलायाला निसर्ग ईश्वर माझ्या पाठी
-
कू – KUU
हळूहळू हे वाजत आहे पानगळीतिल पान वृक्षातळीच्या पाचोळ्याला ऐकू देऊन कान पाचोळ्यातुन ऐकायाला किलबिल किलबिल गान रवीकिरणांचे भू वर आले अगणित सरसर बाण शीळ घालतो सुरभित वारा हरपुन तन मन भान लहर लहरती लता माधवी वेळावीत ग मान जरी छाटली खोडे त्यावर फुटली पर्णे सान पुनव रात्रीला शिशिर नेतसे चंद्रावरती यान उधळुन देती ऋतू सहाही…
-
साय धुक्याची – SAAY DHUKYAACHEE
निळे पारवे गडद दाटले धुके उपवनावरी डोंगरमाथ्यावरून आल्या रवीकिरणांच्या सरी घुसळुन घुसळुन साय धुक्याची आले वर लोणी लोण्यामधुनी दवबिंदूंचे घळघळले पाणी कढवुन लोणी पानोपानी तूप गाळले छान संधीकाली सांजवातीने उजळुन गेले रान धवल चंद्रमा प्राचीवरती झरे चांदणे पान प्राशुन त्याला चकोर गाई स्वातंत्र्याचे गान
-
तराई – TARAAEE
तराईतल्या शांत उपवनी खजिना अक्षररूप कुणी लपविला कोणासाठी खोदुन खोदुन कूप बर्फ जाहल्या सरोवरांवर धुके दाटले गूढ काठावरती झाड जाळते चंदनगंधीत धूप शिशिरामध्ये उपवन अवघे मौनी आत्मस्वरूप व्रतस्थ पक्षी मूकपणाने आळवितो ग भूप पानगळीने वृक्षतळीची माती पर्णांकीत वसंत वाऱ्याची चाहुल मन करते काव्यांकीत
-
नाताळ – NAATAAL
नाताळ घेऊनी आलाय भेटी कोण सांगा घेऊनी भेटींस गोष्टी दोन सांगा गोडवा नात्यात आणे काव्य माझे गातसे नाताळ गाणे रम्य माझे … तराई मम् रुबाईत मीच लिहिले “बोल” गझले मम तराईत मीच दडले बोल गझले भावलिंगी मुनी दिगंबर आत्मधर्मी मम शिलाईत मीच विणले “बोल” गझले … सगाई अखरम वा अखरब असुदे तव वृत्त रुबाई मतला…
-
प्रतिघात – PRATIGHAAT
जाणिवेने नेणिवेचे हात हाती घेतले रे इंद्रधनुचे पंख झुलते सात हाती घेतले रे रंग ता ना पि हि नि पा जा बुडविताना सागराने भावना उधळून घन उत्पात हाती घेतले रे लोभ टाळुन पारध्याने शर गझाला झेलल्यावर नयन बाणांचे कुरंगी घात हाती घेतले रे चंचलेने उधळल्यावर अक्षरी धन मेघनेतुन ओंजळी भरभरुन ते मी गात हाती घेतले…