Category: Marathi kaavya

  • रसोई – RASOEE (KITCHEN)

    घरास माझ्या खिडक्या दारे आत वाहते वसंत वारे प्रभात समयी पक्ष्यांसंगे मन म्हणते मज गा रे गा रे बागेमधली फुले पाहुनी काव्य बरसते दरवळणारे अन्न शिजविते रसोईत मी शुद्ध चवीचे आवडणारे अंगणात गप्पांची मैफल सोबतीस मम प्रियजन सारे जिवलग प्रेमाचे शेजारी जणू हासरे भवती तारे घरात तुजला नाही थारा जा दुःखा तू जा रे जा…

  • जिनमंदिर – JIN MANDIR (JAIN TEMPLE)

    परिसर सुंदर नयनमनोहर तेथे मनभावन जिनमंदिर रम्य वाट मज तिथे नेतसे खाली भूमी वरती अंबर वाजविता हाताने घंटा मंजुळ घुमतो नाद शुभंकर गर्भगृही स्थापित जिनप्रतिमा दर्शन घेता पावन अंतर प्रसन्न होता मम मनमंदिर वाट घरी मज नेई झरझर गझल मात्रावृत्त (मात्रा १६)

  • आसन – AASAN (SITTING)

    धडधडते काळीज थांबता तुझ्यासवे मी घेतो श्वास तव देहाचा झालो परिमल अता राहिलो ना मी भास टकटक होता द्वारावरती मीच उघडले हसून दार म्हणालीस तू सत्वर या या आत पातले अतिथी खास पाणिदार मोत्यांचे आसन अतिथी वदता आम्हा हवे अंगठीतले मौक्तिक पाणी सांडुन भूवर झाली रास दिव्यध्वनी तीर्थंकर वाणी सर्वांगातुन खिरता गान गणधर आत्मा झुकून…

  • मिसरे – MISARE (LINES)

    ऐकायाला बोलायाला तुझ्यासवे मी आहे आज पूर्ण भराया अर्धा प्याला तुझ्यासवे मी आहे आज विसरुनी जा सारी व्यवधाने लिही सोडुनी मुक्त मनास लेखणीतुनी सांडायाला तुझ्यासवे मी आहे आज कागदावरीसळसळताना नागिण काळी होशिल ना ग कात पुराणी टाकायाला तुझ्यासवे मी आहे आज गझलीयत अन काफियातिल अलामतीला ठेव जपून गझल भावघन फुलवायाला तुझ्यासवे मी आहे आज पुन्हा…

  • चर्चा – CHARCHA (DISCUSSION)

    सोडुन दे ना मित्रा काही शब्द बोचरे भोचक आता वर्तमानिच्या वाऱ्यासंगे लयीत झुळझुळ मोहक आता जे जे सुंदर ते तव हृदयी असे जाण तू स्वतः स्वतःला जाणलेस तर तुझ्याप्रमाणे नसेल सुंदर साधक आता दर्शनात तू जैनत्वाच्या  राहशील जर त्यागुन मीपण घडेल तुझियासंगे सुद्धा चर्चा साधक-बाधक आता चल जाऊया गझलेसंगे रम्य जगी या फिरावयाला चित्त ठेवण्या…

  • सळसळ – SALSAL (THRILL)

    नागिण जणु तू तव चालीची सळसळ झालो तुझ्या दुपट्ट्यातिल ढाक्याची मलमल झालो तुझे दुधारी वार झेलण्या कातळ झालो सुगंध प्राशुन त्या वारांतिल परिमळ झालो मिटल्या पापणकाठी तव मी अश्रू होतो नेत्र उघडता तू तव गाली ओघळ झालो तुझी सुई अन तुझाच धागा तुझेच टाके रंगबिरंगी अनेक पदरी वाकळ झालो निर्झरबाला बनून येता तू मम हृदयी…

  • जगण्याची मजा – JAGANYACHEI MAJA (THE JOY OF LIVING)

    चला सारे लुटू आता जगण्याची मजा धो धो धो धो खळाळून हसण्याची मजा गप्पांमध्ये दंग होत गोष्टी रचूया गाऊ नाचू गोल फिरू ठेका धरूया हळूहळू धावू घेऊ फिरण्याची मजा सागराच्या काठावर वाळूतच लोळू चिमणीचा खोपा बांधू ऊन खात पोळू जपून जपून घेऊ धडपडण्याची मजा कपट लोभ क्रोध अहं शत्रू खरे मारू शुद्ध स्वच्छ मने करू…