Category: Marathi kaavya

  • हॅरी पॉटर – HARRY POTTER

    स्वतःच आहे एक परीस हॅरी पॉटर कार्य नेतसे पूर्ण तडीस हॅरी पॉटर कसाबसा एकलाच जगला डर्सलींच्यात डडलीला तो म्हणे खवीस हॅरी पॉटर जादुई शाळेत शिकाया हॉगवर्टसला येता विसरे कटू स्मृतीस हॅरी पॉटर विजलींचे घर गप्पाटप्पा पुडींगच्या त्या कधी न विसरे मस्त चवीस हॅरी पॉटर हर्माइनी नि रॉन सोबती जिवलग त्याचे खुषीत आहे आज मितीस हॅरी…

  • अगम्य – AGAMYA

    तू नवल घडविले रे जे वाटले अगम्य शत्रुत्त्व राहिले ना झालेय आज धन्य हुलकावणीत गेला अज्ञात भूतकाळ केले गुन्हे गुलाबी ते वाटतात क्षम्य ते आठवू कशाला घडले न जे कधीच आहे भविष्य उज्वल मम् वर्तमान रम्य ज्यांच्यासवे मनाने मी जोडलेय मैत्र मोहांध ना मनुज ते दिलदार सैन्य वन्य मूर्तीतल्या अनामिक या वंदिते जिनास आत्म्यात ईश…

  • कट्यार (KATYAAR)

    माझी अमूल्य काव्ये त्यांच्यात प्राण आहे हृदयात गाढ श्रद्धा लय सूर ताल आहे जे जे हवे हवेसे खेचून घ्यावयाला नजरेत चुंबकाची माया तिखार आहे शब्दात भाव भरता गझलेत नाचती ते नृत्यास अर्थ देण्या त्यांच्यात धार आहे मी घालतेन चिलखत तलवार म्यान केली मम् लेखणीच आता झाली कट्यार आहे जेथे गचाळ पाणी डबकी तळ्यात साठे पोचेल…

  • किरमिजी (KIRMIJEE)

    सृष्टीवरल्या प्रेमाची गोष्ट मोठ्या गोडीची कशी सांगू कळेना पेन्सिल बोथट वळेना टोक केले भरभर अक्षरे झरली झरझर केशरी किरमिजी रंगाची टपोर सुगंधित अर्थांची अक्षरे केली गोळा पाणी आले डोळा उंच मस्त हवेली शब्दविटांची बनली इंद्रधनुच्या रंगांनी रंगवली मी ढंगानी बिजलीला ती आवडली म्हणून ढगातून हसली

  • रोज लोटस (ROSE LOTUS)

    रोज लोटस व्हॉटसपवरी दिसतात रोज रोज रोज टपोर गुलाबकळ्या फुलतात रोज रोज झेंडू जाई लिली चमेली सोनटक्क्याचं कुसुम रोज साजरा करायला “डे” खुडतात रोज रोज केवडा बकुळ गुलबक्षी अन भुईचंपक डेझी रोज काव्यात डोकावतात खुलतात रोज रोज बोगनवेली रंगबिरंगी कुंपणावरच्या पऱ्या रोज माझिया रोजनिशीवर उडतात रोज रोज अक्षरगाडीतुन फिरताना गझलफुलांचे मळे रोज जादुई छडी फिरविता…

  • फेसाळत्या नशेचा FESAALHATYAA NASHECHAA

    फेसाळत्या चहाचा जाता भरून प्याला फेसाळत्या दुधाचा आला कुठून प्याला खडकावरून धावे वेगे झरा खळाळे प्याला फेसाळत्या जलाचा घ्यावा पिऊन प्याला मैत्रीत प्रीत आहे प्रीतीत मैत्र आहे फेसाळत्या धुक्याचा गेला खिरून प्याला प्याले न मोजिले मी पेयात नाहले मी फेसाळत्या नशेचा उरला पुरून प्याला मम् शब्द जादुई हे बिजली तयांस घुसळे फेसाळत्या गझलचा येतो वरून…

  • पिंगाट – PINGAAT

    झिंग जंग झिंगाट झिंग झिंग दौड चिंगाट झिंग नाच नाच पिंग्यात गोल झिंग डोल पिंगाट झिंग टांग टांग वाजेल टोल झिंग टिंग टिंगाट झिंग फाड फाड वेगात बोल झिंग फिंग फिंगाट झिंग घेतलेत शिंगावं तीस झिंग शिंग शिंगाट झिंग ढांग ढांग वाजीव ढोल झिंग मंग मिंगाट झिंग दाण दाण दन्नाट नाच झिंग भिंग भिंगाट झिंग…