-
तीस – TEES
प्रथम तू झोड तीस पेल कलम प्रथम तू ठोक तीस झेल कलम फुलवुनी मिथ्य ती खुळी मशाल प्रथम तू रोख ती सलेल कलम धर पुरी काजळी तुझ्या घरात प्रथम तू मोज तीस तेलकलम गझल जी दौडते अशी भरात प्रथम तू जोड ती सजेल कलम चल खरी भांग खास झोकण्यास प्रथम तू घोट तीस बेल कलम…
-
पंचपरमपद – PANCH-PARAM-PAD
उत्तम दशगुण धर्म जाणती मुनी दिगंबर उत्तमतेचे मर्म जाणती मुनी दिगंबर चौविस तीर्थंकर जैनांचे जैन मंदिरी उत्तम अवघड कर्म जाणती मुनी दिगंबर द्रव्यलिंग अन भावलिंग युत पंचपरमपद उत्तम त्यांचे घर्म जाणती मुनी दिगंबर काळे गोरे भुरे गव्हाळी अनंत निवडक उत्तम अस्सल चर्म जाणती मुनी दिगंबर अंगांगावर ठेवायाला बोट कसेही उत्तम कुठले वर्म जाणती मुनी दिगंबर…
-
लिंब अंतरी – LINB ANTAREE
अकिंचन्य धर्माच्या दिवशी झळाळले जिनबिंब अंतरी जळात विहिरीमधल्या हलतो भावुक होउन लिंब अंतरी सान प्रतिक हे अपरिग्रहाचे हवी तेवढी त्रिज्या घेउन भवती अपुल्या भूमी मापे केंद्रक बनुनी टिंब अंतरी काळ्या मेघी पाहुन डोळे नितळ साजिरे मायपित्याचे सर कोसळली सरसर सरसर झाली सृष्टी चिंब अंतरी मुक्तक तीन शेरांचे… मात्रावृत्त (मात्रा ३२)
-
काझी – KAAZEE
भारत भूमी माता माझी जिनानुयायी पिता भारत भूमी मारे बाजी जिनानुयायी पिता धर्म अहिंसा हृदयामध्ये जपण्यासाठी सदा भारत भूमी लढण्या राजी जिनानुयायी पिता मिया नि बीबी असता राजी लग्नासाठी जिथे भारत भूमी होते काझी जिनानुयायी पिता वृद्ध जाहली जरी वयाने कुंतल पिकले जरी भारत भूमी सदैव ताजी जिनानुयायी पिता कटू विषासम सत्य पचवुनी जगण्यासाठी पुन्हा…
-
नाद अनाहत – NAAD ANAAHAT
क्षमा धारणे मार्दव येते हृदय भिजविते मन वचने कृति यात सरलता शौच प्रकटते आत्ममंदिरी नाद अनाहत मधुर बरसण्या अंतर्यामी शिवरुप सुंदर सत्य झळकते धूप सुगंधी मम् कायेचा संयम धर्मी तपोधुनीने यज्ञी जाळुन काम त्यागते भाव आप पर संसाराची करता वृद्धी त्यास त्यागुनी अकिंचन्य मी खरे जाणते उरता सात्त्विक प्रेम न उरता देहासक्त्ती ब्रह्मचर्य त्या निर्मल…
-
खाई – KHAAEE
मी तर सुंदर सुडौल मोहक तरुण मनाची बाई आहे आई आहे पूर्ण नार मी विजेप्रमाणे कडाडणारी घाई आहे आई आहे सुजला सुफला मम् गझलेच्या जमिनीमध्ये अक्षरबीजे पेरायाला लेखणीतुनी टपटपणारी मी झरणारी शाई आहे आई आहे शुभ्र सरोवर राजहंस अन लहरींवरती टपोर कमळे अशी मनोरम गर्द गारवा पांघरलेली मी आंब्याची राई आहे आई आहे मस्त काफ़िये…
-
गजरा – GAJARAA
गडद निळे गडद गडद आभाळ सावळे झाले काळ्या काळ्या जलदांनी नभ भरुनी आले मौक्तिक माळा घालुन सजल्या श्याम मेघना शीळ घालतो मारुत मंजुळ खग घेती फांदीवर ताना झरझर झरझर झरती धारा टपटप टपटप पानांवरती मुदगंधाचा सुगंध प्राशुन शब्द उधळले पानांवरती गोळा करुनी शब्द अंजलीत टपोर गजरा कुणी बनविला माय आठवे सुंदर माझी तिनेच गजरा असा…