-
पल्लेदार – PALLEDAAR
हृदयात माझ्या हसे अतिशय अतिशय चिखलात रुते खोटा अभिनय अतिशय उघड तूच सांग अता फसलाय खेळ इतुके ग नाही बरे जनभय अतिशय आत्मबळ वाढवेल वेड दिवाने येते काय प्रिय तुला मम सय अतिशय नाचतेय मूळ खोड फुलासंगती अल्लड हे अजूनही तव वय अतिशय जमणार गझल पल्लेदार लिहाया सूर ताल जाण पकड अन लय अतिशय गझल…
-
जिवाशिवाचे मीलन – JIVAA SHIVAACHE MEELAN
सह्याद्रीच्या डोंगररांगांतुनी धबाबा धबाबणारा प्रपात सुंदर प्रेमावेगाने कोसळतो शुभ्र खळाळत खळाळणारा प्रपात सुंदर अवखळ मारुत प्रचंड ऊर्जेने भरलेला जलौघास आलिंगन देता पंख पसरुनी हटून मागे त्यास चुंबतो भरारणारा प्रपात सुंदर पंचभुतांच्या जिवंत गात्री उदकांतिल संवेग वायुचा प्रीत तोलता जिवाशिवाचे मीलन होता अखंड दौडे उधाणणारा प्रपात सुंदर गर्जत उसळत अन फेसाळत दरीस भेटे कड्यावरुन झेपावत खाली…
-
घर – GHAR
चंदेरी सोनेरी श्रावणसरी चंदेरी सोनेरी साधन सरी माझे हे सुंदर घर मुक्त होण्या चंदेरी सोनेरी तारण सरी नाचाया बहराया मुग्ध धरणी चंदेरी सोनेरी कारण सरी आत्म्याला चिंब चिंब करावयास चंदेरी सोनेरी पावन सरी आकाशी जलदातुन मौक्तिकांच्या चंदेरी सोनेरी साजन सरी गझल मात्रावृत्त (मात्रा १९, ६/६/७/)
-
गंधोदक – GANDHODAK
मी आहे जादूई चुंबक खेचुन घेते सुंदर रंजक अतीव सुंदर मजला मिळते झुलावया हृदयाचा लंबक हृदय प्रीतिने भरून वाहे पूर्ण उमलला त्यातिल चंपक प्रीत दिली मी प्रीत मिळविण्या माझे रक्षक बनले कंटक रक्षक आता विश्व साजिरे गंधोदक शिंपाया भंजक
-
मानाचा श्रावण – MAANAACHAA SHRAAVAN
मानाचा श्रावण येणार बाई मानाचा श्रावण देणार बाई हेवेदावे मनातली ग कटुता मानाचा श्रावण नेणार बाई पाऊस नक्षत्रांसम मूळ रूप मानाचा श्रावण वेणार बाई अनुराधा मघा हस्त बाळलेणी मानाचा श्रावण लेणार बाई ओंजळी भरून मौक्तिक प्रीतीचे मानाचा श्रावण घेणार बाई गझल मात्रावृत्त (मात्रा १९)
-
दिव्या-दिव्यांची अवस देखणी – DIVYAA-DIVYAANCHEE AVAS DEKHANEE
दिव्या-दिव्यांची अवस देखणी गुणानुरागी सरस देखणी सोमवती देवीस निघाली फेडायाला नवस देखणी बालक पालक आषाढाची कथा ऐकती सुरस देखणी शुद्ध भूवरी पाऊस धार जन्मा येण्या हवस देखणी रानामध्ये बांधावरती तरारली बघ जवस देखणी गझल मात्रावृत्त (मात्रा १६)
-
हाण – HAAN
हाण चार थोबाडावर हाण मार थोबाडावर पाचवीस जो तू पुजला हाण जार थोबाडावर गुंफ मोगरा वासाचा हाण हार थोबाडावर रंग बदलु गिरगिट सरडे हाण ठार थोबाडावर लाव दीप नालीपाशी हाण बार थोबाडावर बेवड्यास पाजुन सरबत हाण सार थोबाडावर गात न्हात खाण्यासाठी हाण वार थोबाडावर खाज ज्यास सुटते राजस हाण खार थोबाडावर तेच षंढ छक्के आले…