Category: Marathi kaavya

  • कट्यार – KATYAR (dagger)

    माझी अमूल्य काव्ये त्यांच्यात प्राण आहे हृदयात गाढ श्रद्धा लय सूर ताल आहे जे जे हवे हवेसे खेचून घ्यावयाला नजरेत चुंबकाची माया तिखार आहे शब्दात भाव भरता गझलेत नाचती ते नृत्यास अर्थ देण्या त्यांच्यात धार आहे मी घालतेन चिलखत तलवार म्यान केली मम् लेखणीच आता झाली कट्यार आहे जेथे गचाळ पाणी डबकी तळ्यात साठे पोचेल…

  • किरमिजी – KIRMIJEE (crimson)

    सृष्टीवरल्या प्रेमाची गोष्ट मोठ्या गोडीची कशी सांगू कळेना पेन्सिल बोथट वळेना टोक केले भरभर अक्षरे झरली झरझर केशरी किरमिजी रंगाची टपोर सुगंधित अर्थांची अक्षरे केली गोळा पाणी आले डोळा उंच मस्त हवेली शब्दविटांची बनली इंद्रधनुच्या रंगांनी रंगवली मी ढंगानी बिजलीला ती आवडली म्हणून ढगातून हसली

  • रोज लोटस – ROSE LOTUS

    रोज लोटस व्हॉटसपवरी दिसतात रोज रोज रोज टपोर गुलाबकळ्या फुलतात रोज रोज झेंडू जाई लिली चमेली सोनटक्क्याचं कुसुम रोज साजरा करायला “डे” खुडतात रोज रोज केवडा बकुळ गुलबक्षी अन भुईचंपक डेझी रोज काव्यात डोकावतात खुलतात रोज रोज बोगनवेली रंगबिरंगी कुंपणावरच्या पऱ्या रोज माझिया रोजनिशीवर उडतात रोज रोज अक्षरगाडीतुन फिरताना गझलफुलांचे मळे रोज जादुई छडी फिरविता…

  • फेसाळती नशा – FESALHATYA NASHA (frothy buzz)

    फेसाळत्या चहाचा जाता भरून प्याला फेसाळत्या दुधाचा आला कुठून प्याला खडकावरून धावे वेगे झरा खळाळे फेसाळत्या जलाचा घ्यावा पिऊन प्याला मैत्रीत प्रीत आहे प्रीतीत मैत्र आहे फेसाळत्या धुक्याचा गेला खिरून प्याला प्याले न मोजिले मी पेयात नाहले मी फेसाळत्या नशेचा उरला पुरून प्याला मम् शब्द जादुई हे बिजली तयांस घुसळे फेसाळत्या गझलचा येतो वरून प्याला…

  • पिंगाट – PINGAAT (light brown)

    झिंग जंग झिंगाट झिंग झिंग दौड चिंगाट झिंग नाच नाच पिंग्यात गोल झिंग डोल पिंगाट झिंग टांग टांग वाजेल टोल झिंग टिंग टिंगाट झिंग फाड फाड वेगात बोल झिंग फिंग फिंगाट झिंग घेतलेत शिंगावं तीस झिंग शिंग शिंगाट झिंग ढांग ढांग वाजीव ढोल झिंग मंग मिंगाट झिंग दाण दाण दन्नाट नाच झिंग भिंग भिंगाट झिंग…

  • जिनध्वजा – (victory banner of JIN)

    प्रथम तू झोड मिथ्य पेल कलम प्रथम तू ठोक मिथ्य झेल कलम विझवुनी मिथ्य ती खुळी मशाल प्रथम तू रोख मिथ्य रेल कलम धर पुरी काजळी पुसावयास प्रथम तू सोड मिथ्य झेल कलम गझल तव दौडते सम्यक भरात प्रथम तू तोड मिथ्य जेल कलम चल खडे ढोंग आज पाडण्यास प्रथम तू फोड मिथ्य बेल कलम…

  • पंचपरमपद – PANCH-PARAM-PAD (“The five supreme states”)

    उत्तम दशगुण धर्म जाणती मुनी दिगंबर उत्तमतेचे मर्म जाणती मुनी दिगंबर चौविस तीर्थंकर जैनांचे जैन मंदिरी उत्तम अवघड कर्म जाणती मुनी दिगंबर द्रव्यलिंग अन भावलिंग युत पंचपरमपद उत्तम त्यांचे घर्म जाणती मुनी दिगंबर काळे गोरे भुरे गव्हाळी अनंत निवडक उत्तम अस्सल चर्म जाणती मुनी दिगंबर अंगांगावर ठेवायाला बोट कसेही उत्तम कुठले वर्म जाणती मुनी दिगंबर…