Category: Marathi kaavya

  • मोसमी पाऊस – MOSAMEE PAOOS

    मोसमी पाऊस यावा चिंब भिजवित माझिया गावात गावा चिंब भिजवित भिजविले मज घन घनाने प्रेमरंगी तो स्वतःही त्यात न्हावा चिंब भिजवित गझल माझी धुंदलेली नाचणारी गातसे तिचियात रावा चिंब भिजवित वीज जेव्हा करितसे सारथ्य मेघी वाजवी पाऊस पावा चिंब भिजवित तू अता ये..तू अता ये… पावसारे “मी” अता करणार धावा चिंब भिजवित गझल अक्षरगणवृत्त (मात्रा…

  • अकारादीक्षरा – AKAARAADEEKSHARAA

    अरण्य भरले फळाफुलांनी वारा वाहे अः अः आठवणीतिल तळ्यात नावा तरंगणाऱ्या पहा पहा इमारतीतिल कैक सदनिका कैक उघडल्या रः रः ईश्वर केवलज्ञानी ब्रम्हा दिशादिशातुन दहा दहा उग्र तपाने प्राप्त मुनींना ऋद्धी सिद्धी मः मः ऊर्ध्वगति जीवास घेऊनी… चिंब पावसी नहा नहा ऋजुगति ऋजुमति सरळ सरल जे जाणायाला वः वः लृकार अक्षर सुवर्णकांती विघ्नविनाशक मः मः…

  • बोलावे – BOLAAVE

    अता खरे तू बोलावे पूर्ण पुरे तू बोलावे खोटे नाते नको जपू जसे झरे तू बोलावे फसवी आशा पुरी नसे जरा बरे तू बोलावे पाऊस येण्यासाठी ग हरित धरे तू बोलावे कशास चर्चा जगण्याच्या कोण मरे तू बोलावे सर्वांमध्ये ढोंग दिसे मीच उरे तू बोलावे कोठडीतुनी सुटावया खरेखुरे तू बोलावे नको लावु तू ओकाया पचे…

  • फुलवाली – FUL VAALEE

    फुलवाली का मूक जाहली बुके बांधुनी झाडांवरचे गुलाब मौनी मुके बांधुनी दाट धुक्यातिल दिसतिल वाटा सूर्य उगवता कसे ठेवशिल निळे पारवे धुके बांधुनी पूल बांधण्या नदीवरी तू पसर ओंडके नकोस ठेवू ओले ते वा सुके बांधुनी नाजुक माझ्या हृदयामध्ये गझलेमध्ये खरेच का मी मुला फुलांना चुके बांधुनी अंबरातल्या अन भूवरल्या साऱ्या चंचल नक्षत्रांना मी तारा…

  • गोम्मट (हाऊस) – GOMMAT (HOUSE)

    गोम्मट व्हिल्यावर घन झुकला पाण्याने भरल्यावर झुकला रंग पारवा निळसर ज्याचा असा जिना वळणावर झुकला वेल कळ्यांनी लदबदली अन शुभ्र फुलांचा मांडव झुकला भित्तीचित्रे कलापूर्ण ही पहा त्यातला मानव झुकला जलाशयावर बरसायाला रंग भरूनी श्रावण झुकला गोम्मट हाऊस मधुन कटता व्यंतर कपटी ! नागर झुकला गोम्मट हाऊस मधले प्रेम पाहुन ओला मोसम झुकला जेते इथले…

  • ओढा – ODHAA

    आयुष्य सुखाने जगतो आम्ही आयुष्य सुखाने भरतो आम्ही व्यापार सुखाचा करती कोणी आयुष्य सुखाचे करतोआम्ही चारित्र्य घडाया अपुले सुंदर आयुष्य सुखाचे स्मरतो आम्ही पाऊस पडाया निघतो जेव्हा आयुष्य सुखावर फुलतो आम्ही धारांत भिजाया येता ओढा आयुष्य सुखावर झुलतो आम्ही गझल मात्रावृत्त (मात्रा १८)

  • छत – CHHAT

    रंगबिरंगी छत्र्यांचे छत वाटेवरती रांग दिव्यांची आहे तेवत वाटेवरती पदपथ इतुका मस्त भोवती फुले वाटिका ज्येष्ठातिल सर आहे नाचत वाटेवरती शालीसम घन मृदुल मुलायम हिरवळीवरी थेंब दवाचे फुलले शत शत वाटेवरती टेबलखुर्च्यांवरी बसूनी घेऊ कॉफी गप्पाटप्पा करता पाहत वाटेवरती लाल गुलाबी हिरवे पिवळे निळे जांभळे रंग मनातिल खुलतिल बरसत वाटेवरती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)