-
स्याद्वाद आहे – SYAADVAAD AAHE
निर्झराचा नाद आहे ही जलाची साद आहे उमटते जी कागदावर ती प्रियेची दाद आहे प्राशुनी मी काव्यगंधा चाखला तव स्वाद आहे पूर्ण जाणे आत्मियाला तो खरा स्याद्वाद आहे मैत्र जडता पाखरांशी गूज अन संवाद आहे नासवीले दूध त्याने त्यास तो मोताद आहे मायभूचा करुन सौदा जाहला बरबाद आहे रंगती गप्पा स्मृतींच्या माजतो तो वाद आहे…
-
शर्वरी – SHARVAREE
दाटता आभाळ काळे नाच नाचे शर्वरी घालुनी पायात वाळे नाच नाचे शर्वरी बोलणे टाळे अताशा व्यर्थ काथ्याकूट तो लावुनी ओठांस टाळे नाच नाचे शर्वरी उमटता सौदामिनीची सागरावर अक्षरे सागरी लाटांस चाळे नाच नाचे शर्वरी गडगडाटी युद्ध होता सावळ्या जलदांतले सोदण्याने नीर गाळे नाच नाचे शर्वरी तीन दगडांच्या चुलीवर पात्र भरले ठेवुनी वाळल्या काष्ठांस जाळे नाच…
-
जलतरंग – JAL TARANG
मुसळधार पावसात पांघरून गारवा वळचणीस थांबलाय चिंब चिंब पारवा गार गार घन टपोर नाचतेय अंगणी जाहला सुस्नात मुग्ध पारिजाति कारवां तरुतळी बकुळ फुले सुगंध मंद उधळिती त्यांस अंथरून दाट अंगणास सारवा सांजरंग मिसळलेत निर्झरात नाचऱ्या जलतरंग वाजवीत मरुत गाय मारवा मेघ बरस बरसतात मोतिरूप जोंधळे मौक्तिकांस त्या चुरून पाखरांस चारवा गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा…
-
चाफा मंद मंद – CHAAFAA MAND MAND
कवी बी यांच्या चाफा बोलेना चाफा चालेना या चालीवर आधारित विडंबन ~~~~~~~ चाफा हिरवा चाफा पिवळा चाफा मंद मंद गंध उधळीत हसला … गेला बागेतुन घरी उधळित सुगंध सरी मन आनंदे भरी त्याचा रंग मला खूप भावला… चाफा मंद मंद गंध उधळीत हसला … चाफा ठेवुन मेजावर फोटो खेचले झरझर धाडुन वॉटसपावर मोद ओसंडून सांडला…
-
पावा – PAAVAA
सोनचाफा दरवळावा अंतरी नाद घंटेचा घुमावा अंतरी मृगजळासम गावसुद्धा मिथ्य ते वाहता ओढा भरावा अंतरी मिथ्य ती आहे कळावी वासना सत्य माझा भाव गावा अंतरी जाळतो वैशाख वणवा सागरा धार झरता चिंब व्हावा अंतरी शब्द ना कळले जरी मज सर्व ते अर्थ त्यांचा आकळावा अंतरी मूर्त मी बघण्यास जाई मंदिरी जिनसखा मजला दिसावा अंतरी मी…
-
यान – YAAN
दाटून मेघ आले वाटे मला लिहावे वळिवात चिंब झाले वाटे मला लिहावे क्षितिजावरी ढगांचे उतरून यान येता ढग बरसण्या निघाले वाटे मला लिहावे आसूड तो विजेचा वाजे ढगात काळ्या धारांत भय बुडाले वाटे मला लिहावे जणु मोगरा नभीचा तैश्या टपोर गारा झेलीत त्यांस न्हाले वाटे मला लिहावे जैश्या सचैल वेली तैशीच काव्यपुष्पे मी काव्यगंध प्याले…
-
म्हातारी – MHAATAAREE
आले आले वादळ वारे उडतो पाचोळा भिजावयाला चिंब पावसी मन झाले गोळा काळे काळे मेघ दाटले पश्चिम क्षितीजावरी संथ मंद वाऱ्याच्या झुळकी झुळझुळती भूवरी नभात पक्षी उडू लागले गाठाया झाडे घरट्यामध्ये परतून आली किती चिमणपाखरे सैरावैरा धावत धावत ढग झाले गोळा भरून गेला आभाळाचा फलक निळा सावळा सुटले वादळ देत इशारा झाडांना अवघ्या खिडकीमधुनी शिरला…