-
ढाल – DHAAL
काही लिहून झाले काही अजून बाकी जिंकून शेर आले काही अजून बाकी चढतेच धार शब्दां गझलेत थेट शिरता बनलेत तेच भाले काही अजून बाकी ओठांवरी फुलांचे भरले अनेक झेले काही दवात न्हाले काही अजून बाकी तोडून शृंखलांना झालेत मुक्त पक्षी काही नभी उडाले काही अजून बाकी काही अजून भोगी संतप्त भासताती काही उभे जळाले काही…
-
सदरे – SADARE
मौन या ऐन्यास वाचा का बरे सांगा फुटेना पाहता बिंबास मत्सर औषधालाही मिळेना मी कसे पटवू तुलाकी बिंब हे माझेच आहे पांघरीशी वेड म्हणुनी सत्य तुजला बोलवेना फक्त अपुले ना कुणीरे मालकी दावू नको तू हक्क सौंदर्यास कोंडे हक्कही तुज पेलवेना वेळ आली खास जेव्हा मालकी भिरकावण्याची अंतरी दिसलेच कोणी स्वच्छ चष्मा सापडेना जीव भावाचा…
-
स्वर्ण – SWARN
असे असावे धैर्य हृदयीचे पाण्याला जे बर्फ बनविते असे असावे शौर्य नारीचे अर्धे जे जे पूर्ण बनविते असे असावे विणूनी शिवणे पुण्याने जे अर्थ बनविते असे असावे ऊन हळदीचे कर्माला जे जीर्ण बनविते असे असावे पैंजण पदीचे रुणझुणते जे तर्क बनविते असे असावे झिजणे चंदनी हितकर प्रिय जे अर्क बनविते असे असावे वादळ आत्मीक स्वभावास…
-
चक्रीवादळ – CHAKREE VAADAL
आहे ओंजळ खरी अंजली नाही मृगजळ खरी अंजली उठवुन मोहळ खरी अंजली बनते वादळ खरी अंजली पाणिपात्र मम भरण्यासाठी फोडे कातळ खरी अंजली कधी झुळूक तर कधी भासते चक्रीवादळ खरी अंजली आज सुनेत्रा तृप्त जाहली बनता वाकळ खरी अंजली गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)
-
स्वाक्षरी – SWAAKSHAREE
अस्त्र माझे भेदणारे ढाल आहे उजळलेले लेखणीचे भाल आहे कागदावर नाचताना लेखणीही प्रीत माझी गात देते ताल आहे हे नव्हे रे केस माझे कृष्ण कुरळे ही निशेला तू दिलेली शाल आहे हे नव्हे रे ओठ माझे रंगलेले हा गुलाबाचा गुलाबी गाल आहे हाच रे कागद तुझा तो हरवलेला हळद ओली स्वाक्षरी बघ लाल आहे तू…
-
अप्सरा – APSARAA
आज मतला थरथरे हा बावरा बावरोनी होतसे हा लाजरा नाचताती शेरणी गझलेमधे शेर बब्बर गुरगुरे मग नाचरा हाय मज हा छंद पुन्हा लागला पाठ म्हणते तू विसावा घे जरा काळ वेडा कालचा झाला जुना माझियावर फोडिशी का खापरा पाठ माझी जाहली रे मोकळी जाळता मी शुभ्र नीतळ कापरा काफिया तू मौन आता सोडना बावऱ्या झाल्यात…
-
सोहम – SOHAM
प्रथम दीन तव कुवेड गे गरम मीन तव कुवेड गे टोचत आहे तुझे तुला कलम पीन तव कुवेड गे जा जा जा तू कर काळे तलम जीन तव कुवेड गे नकोच दारी पाय तुझा परम हीन तव कुवेड गे कुदेव-देवी मूढ मती शरम लीन तव कुवेड गे सम्यक्त्वाने संपविले अधम बीन तव कुवेड गे सोहम…