-
केंद्र – KENDRA
केंद्र कोणते परीघ पुसतो नवल वाटते त्रिज्येला ठोकुन खुंटी केंद्रावर ती मार्ग आखते संध्येला संधीकाली डोंगरमाथी रंग केशरी उधळाया सविता उतरे जळात अलगद सोनेरी तनु बुडवाया तरंग उठती निळ्या जळावर वर्तुळ विस्तारत जाते व्यासही मोठा मोठा बनतो काठाशी जोडे नाते स्पर्शायाला मृदा काठची लहरींसंगे धावाया वारा येतो शीळ घालतो जलबिंदूंना चुंबाया जलदेवी रात्रीला येते मुग्ध…
-
यमाई – YAMAAEE
नजरेमध्ये प्रेम असूदे विषय कशाला वयात अन्तर अंतरात मग प्रणय कशाला भाव भावना भरून वाहे कुठे वास ना वसन लपेटू दहा दिशांचे प्रलय कशाला स्वभाव अपुला जपेल ‘मी’ रे नको काळजी कधी उसळ अन उर्मट हो तू विनय कशाला मला न भीती अपघाताची अन मरणाची मीच यमाई तुझ्याकडुन मज अभय कशाला अचूक समयी समई विझते…
-
मुक्त हस्त चित्र – MUKT HAST CHITR
मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून…
-
नको जीव मारू – NAKO JEEV MAAROO
नको काक मारू नको जीव मारू किनाऱ्यास तारू नको जीव मारू करे पोट पूजा लुटोनी दुकाने जरी तो लुटारू नको जीव मारू उन्हाने जळाली कुणाची पिके अन म्हणे तूस वारू नको जीव मारू तुला सावल्यांचा निवारा मिळाला जलाला फवारू नको जीव मारू तुला आवडे जर पहाया फुलांचा व्हिडीओ शिमारू नको जीव मारू लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/
-
भुगा – BHUGAA
अखेर मी गाठलेच त्यांना अखेर मी कोंडलेच त्यांना वरून अक्षत जरी वाटती अखेर मी चाळलेच त्यांना किती खडे पांढरे काढुनी अखेर मी ठेचलेच त्यांना ठेचुन चेचुन भुगा करोनी अखेर मी पेरलेच त्यांना सुगंध मातीतला उधळण्या अखेर मी वाटलेच त्यांना मात्रावृत्त(१६मात्रा)
-
प्रतिमा माझी – PRATIMAA MAAZEE
प्रतिमा माझी मस्त मस्त पण मस्त त्याहुनी आहे मीच काया माझी चुस्त चुस्त पण चुस्त त्याहुनी आहे मीच कामांधांना बुभुक्षितांना शिस्त लावण्या जागी मीच रातराणिच्या अवती भवती गस्त घालण्या जागी मीच नैवेद्याचे ताट पूर्ण हे फस्त कराया आले मी ग धान्य-धुन्य अन भाजीपाला स्वस्त कराया आले मी ग गवतमधल्या तणा माजल्या नष्ट कराया जिजीविषा मी…
-
बादल – BAADAL
बादलीत बरसतोय बादल दलदलीत झिरपतोय बादल बदबद वर्षत रिता जाहला रिक्त मनी पसरतोय बादल दल बदलूनी गिरगिट होतो शेर होत गरजतोय बादल श्वेतश्याम वा कृष्णधवल म्हण शब्द अब्द प्रसवतोय बादल हलका फुलका पुन्हा होउनी निळ्या नभी लहरतोय बादल मात्रावृत्त(१६मात्रा)