-
गोठा – GOTHAA (COW SHED)
-
भट्टी – BHATTEE (KILN)
समय आहे शांत आहे मुग्ध अंतर गात आहे वारियातील मोगऱ्याच्या परिमलाने न्हात आहे कुंदनाचे पात्र ग्रीष्मा वितळता भट्टीत तुझिया मृत्तिकेचा गंध त्यातिल माझिया देहात आहे मी कशी परजेन शस्त्रे मारण्या जीवास कुठल्या जीव जगण्या लेखणीची परजते मी पात आहे लाट येता पाणियातिल बिंब हलते फक्त माझे तू नको पण डळमळू रे मी कुठे पाण्यात आहे…
-
कुळवाडीण -(“A peasant woman”)
गझलेची या हडळ जाहली हझल वाचवायला मध्यरात्र होताच जाय ती रान कोळपायला आमटी भाकरी खाऊन पोरगं जाय साळंला मायंदाळ शिकलं मोठं झालं म्यागी पचवायला खारट कडवट पचवून हसतो सदासर्वदा तो पचलं नै वाटतं म्हणतं कोणी त्याला खिजवायला कुळवाडीण शेतात राबते खांब घराचा ती अंगण झाडुन लगबग जाते शेत भांगलायला फिरुन डोंगरी करवंदाच्या पाट्या भरुनभरून मैना…
-
पियानो – PIANO
एक नाकपाक गाव होतं. त्या गावातल्या एका ऐसपैस दूमजली हवेशीर घरात एक अनाथ मुलगी रहायची. त्या घराच्या मागील बाजूच्या सज्ज्यातून बर्फाच्छादित पर्वतांची शिखरे दिसायची. ती अनाथ मुलगी गेले कित्येक दिवस त्या घरात बसून एकटीच काहीतरी लिहीत बसायची. काहीतरी म्हणजे …फुलांच्या, पाखरांच्या, नद्यांच्या, पर्वतांच्या आणि मंदिरांच्या गोष्टी व गाणी ती लिहीत बसे. ती अनाथ असल्याने गावातले…
-
कोणाला – KONAALAA (to whom)
काव्यप्रकार – कुंडल या काव्यप्रकारात एकूण सहा चरण असतात. प्रत्येक चरणात एकूण २४ मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या चरणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. शेवटच्या दोन चरणात आत्म्यावरभाष्य केलेले असते. दुसऱ्या चरणात जो शेवटचा शब्द किंवा शब्द समूह आलेला असतो त्या शब्दाने किंवा…
-
उचललास तू – UCHALALAAS TOO
उचललास तू रदीफ माझा टाळलेस मम काफियांस का जमीन अवघी सुंदर असुनी गाळलेस मम काफियांस का राखेमधल्या ठिणग्यांमधुनी झळाळून ते उठतिल पुन्हा ठाउक होते सत्य तुला पण जाळलेस मम काफियांस का ऊन देउनी पाखडलेले पारखलेले निवडक असुनी तुझ्या फाटक्या चाळणीतुनी चाळलेस मम काफियांस का बिनकाटेरी तव कवितेला बाभुळकाटी कुंपण असता राखण करण्या काव्यफुलांची पाळलेस मम…
-
भुजंग – BHUJANGA
गझल सळसळूदे भुजंगाप्रमाणे तिच्या नेत्रज्योती कुरंगाप्रमाणे गझल मैफिलीला अता रंग चढला तुझी साथ मजला मृदंगाप्रमाणे अता दोर आहे धरेच्याच हाती भरारे गझल ही पतंगाप्रमाणे मुला-माणसांनी फुला-पाखरांनी गझल गुणगुणावी अभंगाप्रमाणे जली राजहंसा तुझा डौल भारी गझल त्यात माझी तरंगाप्रमाणे वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २० लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल…