Category: Marathi katha

  • धात्री – DHATRI

    तीन रुबाया एकल… वड्यास एकल कधी न खावे खावे पावासंगे नाहीतर मग युद्ध प्रकृती कफ पित्ताचे रंगे छातीमधुनी घशात येता खोकुन खोकुन ठसके लसुण पाकळ्या चावुन खाव्या कोमट पाण्यासंगे दवांई … हरित पीत अन श्वेत कफाने वात आणला बाई वैद्यांचा मग घे तू सल्ला सत्त्वर कर घाई छातीमध्ये न्युमोनियाची जाळीवर जाळी टाळशील जर पथ्य दवांई…

  • जिनप्रतिमा – JIN PRATIMA

    दोन रुबाया जिनदेव … रुबाईची लय पकडून झरते झरझर अक्षर गाणे जिनदेव अंतरी वसे दिगंबर जगण्या स्वतंत्रतेने कशास शोधू देव काष्ठी अन जळी स्थळी पाषाणी झरझर झरती भूमीवरती माझी अक्षरगाणी जिनप्रतिमा … या ब्रह्मांडाचा धर्म अहिंसा जिनानुयायांचा मम देहच अवघा झाला आहे जिनमंदिर सांचा अंतर्यामी जिनप्रतिमा स्थित नित्य दर्शनासाठी जिनवानी ज्ञानामृत पाजे सत्य पंच परमेष्ठी

  • गोठा – GOTHAA

    माईंचा गोठा रिकामा झाला. दुभती म्हैस कुलकर्णीने नेली. भाकड गाय गोशाळेला दिली. माईंनी मोलकर्णीला पगार देऊन, शेणकुटे नाडकर्णींच्या नातवाला होळीसाठी दान दिली. गोठ्यासमोर घोंगडे टाकून माई मग लिहायला बसली. अलक… अती लघुत्तम कथा.

  • भट्टी – BHATTEE

    समय आहे शांत आहे मुग्ध अंतर गात आहे वारियातील मोगऱ्याच्या परिमलाने न्हात आहे कुंदनाचे पात्र ग्रीष्मा वितळता भट्टीत तुझिया मृत्तिकेचा गंध त्यातिल माझिया देहात आहे मी कशी परजेन शस्त्रे मारण्या जीवास कुठल्या जीव जगण्या लेखणीची परजते मी पात आहे लाट येता पाणियातिल बिंब हलते फक्त माझे तू नको पण डळमळू रे मी कुठे पाण्यात आहे…

  • कुळवाडीण – KUL VAADEEN

    गझलेची या हडळ जाहली हझल वाचवायला मध्यरात्र होताच जाय ती रान कोळपायला आमटी भाकरी खाऊन पोरगं जाय साळंला मायंदाळ शिकलं मोठं झालं म्यागी पचवायला खारट कडवट पचवून हसतो सदासर्वदा तो पचलं नै वाटतं म्हणतं कोणी त्याला खिजवायला कुळवाडीण शेतात राबते खांब घराचा ती अंगण झाडुन लगबग जाते शेत भांगलायला फिरुन डोंगरी करवंदाच्या पाट्या भरुनभरून मैना…

  • पियानो – PIANO

    एक नाकपाक गाव होतं. त्या गावातल्या एका ऐसपैस दूमजली हवेशीर घरात एक अनाथ मुलगी रहायची. त्या घराच्या मागील बाजूच्या सज्ज्यातून बर्फाच्छादित पर्वतांची शिखरे दिसायची. ती अनाथ मुलगी गेले कित्येक दिवस त्या घरात बसून एकटीच काहीतरी लिहीत बसायची. काहीतरी म्हणजे …फुलांच्या, पाखरांच्या, नद्यांच्या, पर्वतांच्या आणि मंदिरांच्या गोष्टी व गाणी ती लिहीत बसे. ती अनाथ असल्याने गावातले…

  • उचललास तू – UCHALALAAS TOO

    उचललास तू रदीफ माझा टाळलेस मम काफियांस का जमीन अवघी सुंदर असुनी गाळलेस मम काफियांस का राखेमधल्या ठिणग्यांमधुनी झळाळून ते उठतिल पुन्हा ठाउक होते सत्य तुला पण जाळलेस  मम काफियांस का ऊन देउनी पाखडलेले पारखलेले निवडक असुनी तुझ्या फाटक्या चाळणीतुनी चाळलेस  मम काफियांस का बिनकाटेरी तव कवितेला बाभुळकाटी कुंपण असता राखण करण्या काव्यफुलांची पाळलेस  मम…