-
कार्यकारणभाव – KARY KARAN BHAV
कार्यकारण भाव जाणू सृष्टिचे विज्ञान जाणू रोखण्यास्तव कर्मबंधन संवराचे कार्य जाणू जीव पुद्गल वेगळेपण अंतरी ध्यानात जाणू निर्जरेच्या साधनेला तपवुनी देहास जाणू धर्म जीवांचा अहिंसा हे सुनेत्रा सत्य जाणू
-
कामशेत – KAMSHET
नगर ग्राम शेत छान रे गाळ घाम शेत छान रे (जमीन मतला ) धरण पानशेत छान रे काळ काम शेत छान रे (हुस्ने मतला) धाम कामशेत गावकी वेळ दाम शेत छान रे एकसाथ राबतात दो डाव वाम शेत छान रे रे त अर्थ शोधला बरा साम पाम शेत छान रे अश्व वेग घोडदौड तव कृष्ण…
-
चौकस – CHOUKAS
बंध बांधतात जीवाला संसार मग सुरु होतो, भावभावनांचा आस्रव होता पालवी फुटुन हिरवा होतो. नातीगोती फांद्यांसमान पानाफुलांनी बहरून जातात, सहा ऋतूंचे चक्र त्यातून हळूहळू फिरत राहतात. मातृपितृधर्म स्मरून सहज व्हावीत कर्तव्ये, व्यवहार निश्चय जपत जपत सांभाळावे घर आपले. कधी थोडे कठोर व्हावे स्वतःस शिस्त लावावी, हृदयामधले मंदिर मूर्ती ध्यान लावून पाहावी. आपलेच कर्म आणि इच्छा…
-
शिशुपण – SHISHUPAN
पुराण इतिहास भूगोल वाचत लिहावं पुस्तक असं वाटतं, कुणी नाही वाचलं तरी परत परत लिहावं वाटतं. दशपदीतल्या दहा ओळींचे कशाला मोजावे काने मात्रे, लय पकडुन अक्षरांवर ओढावे खुशाल सहज फराटे. काटे फराटे बरे असतात सलामत ठेवतात गुपित जपून, सरसर झाडावर झटकन पटकन जाते जशी खार चढून, अजुन अजून अजून म्हणतं बाळ चॉकलेटचा हट्ट धरून, समजावून…