सत्य अहिंसा परम धर्म हा स्वभाव जीवाचा
देहाशी मम आहे मैत्री माझ्या जीवाची ..माझ्या..
शरीर साधन मोक्ष मिळवण्या जीवासाठी जाणा ..
मन माझे धन मौल्यवान मन आत्म्यातील खजिना ..
मन माझे मन माझ्या आधीन ..
जाणीव नेणीव माझ्या आधीन ..
जाणिवेची पाच इंद्रिये…
गोळा करती ज्ञान माहिती..
अनुभव घेती..शिकत राहती..
जात राहती पुढती पुढती …
विचार करिती अतीव सुंदर…
विचार म्हणजे कारण सुंदर…
जाणिवेतील बाग बहरण्या ..
नेणीव जाणे निसर्ग नियमा..
अतींद्रिय शक्तीने देण्या ..
नेणीव करते सहज सहज किती…
श्वसन पचन अन रक्ताभिसरण ..
जाणीव घाले वाद जगाशी .
वाद घाले नेणीव ना कधी…
जाणीव भरवे नेणिवेला..
हवे तिला जे वाटे जेव्हा ..
ऐक अता मम माझ्या गझले..माझ्या कविते…
“नेणीव म्हणजे सुप्त शक्ती..अमूर्त आत्मा..
जाणीव आहे कर्णधार जणु
चालवणारे जहाज मजबुत
तव कायेचे ..
हवे तुला जे वृत्त घेऊनी
खळाळ आता झऱ्याप्रमाणे ..
मुक्तछंद होऊनी …
घे निवडीची स्वतंत्रता तू
नेणीवेतून बहर फुलांचा ..
…फुलाफळांनी बहरून येण्या ..
सुगंध परिमल भरून वाहण्या ..
अंधश्रद्धा भीतीस मारून गोळी आता…
जा जा पुढती करण्या क्रांती..
म्हणती तुज हे मनुष्यप्राणी ..मनुष्य प्राणी…
सत्य चिरंतन जगावयाचे शिकव माणसा ..
तव शब्दांतून.. सांग सार तू
जीवा जाणण्याचे
जिवास जगवण्याचे…….”