Category: marathi kavya

  • चमत्कार – CHAMATKAR(MIRACLE)

    दर्शन दे ईश्वरा… भिवविते जन्म मरण अन जरा चमत्कार हा असा घडावा मनातला भ्रम गळुन पडावा कटू जरी मज सत्य कळावे इच्छा ही प्रभुवरा… हृदयी गुंता होऊन बसता अज्ञानातिल सुख कुरवाळता एक घाव अन दो तुकडे हा उपाय वाटे बरा… आस मनीची पूर्ण होऊदे प्रेमामध्ये चिंब न्हाऊदे खरे न खोटे सारे कळूदे भेट मला प्रियकरा…

  • साद दे रे – SAD DERE(CALL ME )

    कशी काय बोलू मला बोलवेना कसा भार साहू अता साहवेना हृदय वाहते हे तुझ्या आठवांनी मनाला तरीही झुला बांधवेना असे वाटते सर्व सोडून यावे कुठे यायचे पण मनाला कळेना करू काय माझ्या-तुझ्या पाकळ्यांचे किती हार गुंफू गळा घालवेना खुशाली तुझी फक्त सांगेल कोणी जळो तूप सारे दिवा मालवेना सुनेत्रा सुनेत्रा अशी साद दे रे तुझे…

  • का देता मज ठोक? – KAA DETA MAJ THOK?(WHY ARE YOU BEATING ME?)

    का देता मज ठोक? गुरुजी का देता मज चोप? रोजच करते घोकंपट्टी कधी न घेते सुट्टीबिट्टी तरी न मिळतो नंबर पहिला आई करते कोप गुरुजी का देता मज चोप? स्वत:च रचतो कविता सुंदर शिकतो मीही  जादू मंतर गंडेदोरे बुवाबाजीचा करतो भांडाफोड गुरुजी का देता मज चोप? रागदारी मी स्वरात बांधिन मधुर मधुर मी गाणी गाईन…

  • रिक्त रिक्त रात्र – RIKT RIKT RATRA(EMPTY NIGHT)

    नेत्रात धुंद प्रीत पण रिक्त रिक्त रात्र अधरात मुग्ध गीत पण रिक्त रिक्त रात्र नयनात सांजवात घन सावळे उरात मल्हार आळवीत पण रिक्त रिक्त रात्र आहे अता सुरात माझा-तुझा प्रवास अंधार पाकळीत पण रिक्त रिक्त रात्र काट्यास मी जपेन पुष्पास सांग तूच रंगास पाखडीत पण रिक्त रिक्त रात्र बघ वर्षतात मेघ अन नाचतात मोर भिजते…

  • फुले – FLOWERS

    अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे फुले तू दिलेली किती भावली ही परी आवडे ती सुपारी मला रे फुले चुंबण्याचा  मला शौक भारी म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे ‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन कळाली नशेची खुमारी…