भिजून चिंब चिंब मी
तरी नसे तुडुंब मी
विशाल शून्य तू जरी
निवांत एक टिंब मी
झळाळशील बघ अता
तुझेच शांत बिंब मी
करेन शुद्ध ही हवा
कडू वनात निंब मी
जपेन गारवा इथे
नव्हेच आग, बंब मी
नकोच आडवे पडू
कधी कधीच लंब मी
वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.
भिजून चिंब चिंब मी
तरी नसे तुडुंब मी
विशाल शून्य तू जरी
निवांत एक टिंब मी
झळाळशील बघ अता
तुझेच शांत बिंब मी
करेन शुद्ध ही हवा
कडू वनात निंब मी
जपेन गारवा इथे
नव्हेच आग, बंब मी
नकोच आडवे पडू
कधी कधीच लंब मी
वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.