Category: marathi kavya

  • धग – DHAG(FLAME)

    जाहले चरबट आच रे कर सोसुनी धग खले पाथरवट काच रे पर चोरुनी धग माठ फोडूनी टाकले कचऱ्यात खापर वळले आचरट जाच रे धर राखुनी धग तीर कमठा खांद्यावरी घेऊन निघता दले मारुन कट का चरे शर लाटुनी धग जीव मी जगवुनी जगे सत्यास स्थापुन थांबले धुरकट नाच रे हर गर्जुनी धग “सुनेत्रा” अक्षररंग उधळे…

  • नवकळ – NAVKAL(NEW ERA)

    फटकळ मी तण कळ मी सळसळते अटकळ मी टपटप ती कळकळ मी झटपट झी मरकळ मी झरझरता नळ कळ मी बरहमणी भट कळ मी फिरव जरा नट कळ मी उघड हळू घटकळ मी नमन जिना नवकळ मी  

  • वाईच – VAICH(SPARING)

    वाईच ….. एक मुक्तक ! वाईच शब्दामधल्या ‘च’ चा अर्थ अल्पसा वाईच शब्दांमधील ‘च’ हा नसे भरीचा महाबळेश्वर सवे पाटण निसर्ग सुंदर ,,,, वाईच फक्त न .. जावळीसह मेढासुद्धा !!!

  • गाय – GAI( TO SING)

    एक मुक्तक .. कन्यापूजा कन्यापूजा कन्यादान कैसे करु कैवल्या दान मम व्यवहारा दान न देण पुत्र सुता हे मिथ्या दान गझल… गाय ज्ञान गान हृदय गाय गझल गीर मलय गाय मुक्तकात मम सुनेत्र प्रीत कमळ वलय गाय मोगरा जपा गुलाब कृष्ण कांचन लय गाय सागरी समुद्र देव अंतरात प्रलय गाय नाम ना विशेषणात मुक्त रण्य…

  • चौघडा – CHOUGHDA(FOUR KETTLEDRUMS)

    घन काळे काळे गगनी भादवा दवा आत्म्याला चिरि कुंकू रेख ललाटी दे जाप्य काव्य कुसुमाला जोडून करांचे तळवे जुळविली कराग्रे दाही मी भाव अर्घ्य दिधले पारणा व्रताची झाली निळीशार हवेली मौन रानभर सळसळे ऊस कलशात खिराया दहिवर थांबला जलद पाऊस किरणांनी जादू केली निवळली धुक्याची दुलई सृष्टीशी गप्पा गोष्टी झंकार चौघडा सनई

  • भावंडे – BHAVANDE(SIBLINGS)

    आरतीला सूर्य तारे चंद्र नक्षत्रे उभी अंतरी जिन स्थापिला मी जैन भावंडे उभी सागरी दुर्गावरी ध्वज पंचरंगी फडफडे रंग देखाव्यात भरण्या मृत्तिका चित्रे उभी पंचगंगा वारणा कृष्णा कऱ्हा गोदावरी काफिया स्वर गझल नैया फेकुनी जाळे उभी अंतराळातील व्यंतर देव आले दर्शना मार्ग त्यांचा शुद्ध करण्या हळदुली पत्रे उभी ओतता तबकात राशी शुद्ध भावे ओंजळी उघडली…

  • स्मार्ट – SMART

    लीड माझे लेखणीने जीव रक्षे लेखणीने सत्य धर्मा जागताना जलद खोडे लेखणीने संगणक हा स्मार्ट साधू शीड हलवे लेखणीने मज उणे नाही कुठेही पात्र भरते लेखणीने टोक गाठाया सुनेत्रा खुंट रोवे लेखणीने