शुभाशुभाची वर्दळ वावर न्याहाळू अंतरा
शुद्ध भाव राहण्यास स्थावर प्रक्षाळू अंतरा
मुखडा आणिक अंतऱ्यातला फरक जाणल्यावरी
हलके हलके मिटेल अंतर सांभाळू अंतरा
गझलेमधला रदीफ जैसा पुन्हा पुन्हा येतसे
ऐसा जणू तो मुखडा वत्सल मायाळू अंतरा
गझलियतीसह काफियातील अलामतीचा मणी
चित्रांकित रत्नत्रय हृदयी गंधाळू अंतरा
हिऱ्याप्रमाणे नाव झळकते सोन्याच्या कोंदणी
पुरुषार्थाच्या दली उमलतो लाजाळू अंतरा