Category: marathi kavya

  • सूळ SOOL

    डोळ्यात धूळ गेली ढवळून मूळ गेली धुंडून कोपऱ्यांना पाहून कूळ गेली डोक्यात स्वच्छतेचे घेऊन खूळ गेली उतरून मस्तकी मम उठवून शूळ गेली झालीच गझल भारी घालून रूळ गेली रक्ता चटावलेला मोडून सूळ गेली तोंडात साठलेली टाकून चूळ गेली

  • किमया – KIMAYA

    माल्यश्री वृत्तातिल किमया मंत्र जपू पिसे लागले तरी मतीने तंत्र जपू प्राणज्योत तेवण्या मंदिरी गाभारी देहवल्लरीतिल हृदयाचे यंत्र जपू वृत्ताचे नाव – माल्यश्री वृत्त प्रकार – मात्रावृत्त मात्रा – २२ (१६/ ६)

  • गुरुकृपा – GURU KRUPAA

    गा उन्हाचे रंग उधळत मस्तपैकी गा धरेला मस्त खुलवत मस्तपैकी नित्य असतो पंचमी सण फाल्गुनी बघ राग रुसवा सोड पळवत मस्तपैकी लाल पिवळा जांभळा घन गगन चुंबे नाच चपले धुंद चमकत मस्तपैकी काय बरवे काय सुखवे ओळखूनी बरस मेघा देह भिजवत मस्तपैकी मोतियांसम शब्द बरसे गझल वेडी गा ढगा रे ढोल बडवत मस्त पैकी तू…

  • वेढे – VEDHE

    मस्तपैकी मी लिहावे नित्य काही मस्त बाकी तू जपावे नित्य काही कल्पना माझी असो की त्या फुलाची मस्त आणिक छान द्यावे नित्य काही संगती एकांत नाजुक सांज प्याले मस्त साकी तू भरावे नित्य काही गोठलेल्या काफियांची आ अलामत मस्त बदले मी पुरावे नित्य काही मी न माने अन जुमाने पुद्गलाला मस्त माझे मी स्मरावे नित्य…

  • रदीफ RADEEF

    आज कोणता शब्द वापरू रदीफ म्हणुनी तंग काफिया हिंदी उर्दू खलीफ म्हणुनी गुरू इलाही जैसा कोणी असेल जर तर सहजच सुचले तीन काफिये शरीफ म्हणुनी एक जाहले दोन शब्द हे मजनू मजनी कुठला निवडू रामबाण मी अलीफ म्हणुनी साक्षी भावे न्याय कराया शब्दार्थांचा भाव खरोखर टिकेल सच्चा हनीफ म्हणुनी लतीफ आणिक हनीफ मिळता गझल पूर्ण…

  • धाव – DHAV

    रंग रूप आरसा मनाचा तृप्त कृष्ण घन तसा मनाचा कोण डाव खेळते कुणाशी रंग गडद बघ तसा मनाचा शीळ वात घालता मजेने धाव घेतसे ससा मनाचा शिंपल्यात दो झरे वसंती गझल उधळते पसा मनाचा गाल गालगा लगा सुनेत्रा सहज पेलते वसा मनाचा

  • क्या बात – KYA BAAT

    वाहवा क्या बात ही जणु दुधारी पात ही मातृधर्मा  जागते नागिणीची जात ही लखलखे जणु आत्मजा टाकुनी बघ कात ही ही न मिथ्या देवता समय समई वात ही मी “सुनेत्रा” टपटपे गझल लिहिते गात ही