Category: marathi kavya

  • बीजमंत्र – BEEJ MANTRA

    आत आत अंतरात बीजमंत्र घुमतात आत हृदय सप्तकात बीजमंत्र घुमतात गा ल गा ल गा व ली य इंग्रजीत ललबाय आत गर्भ गीत गात बीजमंत्र घुमतात सागरात गाजणार लहर लाट खिरणार आत खिरत एकजात बीजमंत्र घुमतात गोल घुमट आस सरळ वर्तमान भुतकाळ आत हात कंकणात बीजमंत्र घुमतात नाम गजर झांज टाळ अक्षरून फुलबाग आत वळुन…

  • सोम – SOM

    सोम सुंदर वार आहे सोम शंकर वार आहे कोण म्हणते सोम मदिरा सोम संगर वार आहे गालगागा दोन वेळा सोम मंतर वार आहे चंद्रमा अन सिद्ध शीला सोम अंबर वार आहे वार मोजाया खड्यांनी सोम कंकर वार आहे अंधश्रद्धा सोड मनुजा सोम अंतर वार आहे मी सुनेत्रा जाणते हे सोम मंदिर वार आहे

  • अंचल – ANCHAL

    मंगल मंगल मंगळवार मंगल चंचल मंगळवार अंबर अंतर लालेलाल मंगल दंगल मंगळवार सुंदर नीरज तालेवार मंगल जंगल मंगळवार अंगण कुंतल गारेगार मंगल अंचल मंगळवार पीठ सुनेत्रा दाणेदार मंगल संबल मंगळवार

  • भूल – BHUL

    मन कधी पारवा रे कळ गूढ गार वारे घन भूल भुलाबाई मन राग मारवा रे वन गर्द सावलीचे मन नवा कारवा रे तन बर्फ गोठलेले मन तसे ठार वारे हातभर भुई माझी मन म्हणे सारवा रे

  • सुई – SUI

    खिशावर सुनेत्रा लिहावी गझल खिशावर सुनेत्रा खुलावी गझल सुनेत्रा सुनेत्रा सुनेत्रा म्हणत खिशावर सुनेत्रा तपावी गझल सुनेत्रा तरल या जलावर उभी खिशावर सुनेत्रा झुलावी गझल सुनेत्रात दृष्टी सुनेत्रा खरी खिशावर सुनेत्रा दिसावी गझल सुनेत्रा सुईने तुझ्या नव निळ्या खिशावर सुनेत्रा विणावी गझल

  • जिनस्तुती – JIN STUTI

    शुक्रवार शुक्रवार शुक्रवार गा शुक्र धार वीर नार गाल गाल गा आज दिवस शुक्रवार काल कोणता शुक्रवार च्या प्रथम गुरूर वार गा शुक्रवार नंतर दिन सांग कोठला वासर शनि हाच ठाम करत कार्य गा राध शुद्ध अर्थ बोल आत्म देव रे रवि नि सोम निकट वार ताल धरत गा काफिया स्वर मधुर मम तरल भावना…

  • झंझावात – ZANZAVAT

    अंतरीच्या वेदनेला लोचनी पाळू नको मौन जर हे वेळकाढू कुंडली माळू नको कवळ झंझावात जलदा गिरिमुखावर वर्षण्या नेत्र प्रक्षाळून घे पण भाव प्रक्षाळू नको परसदारी फुलव कर्दळ केळ अळु अन दोडका सांडपाण्यावर घराच्या गाव खंगाळू नको गोवऱ्या वा शेणकूटे शब्द कुठलाही असो तीन धोंड्यांच्या चुलीवर घामबिम गाळू नको सप्तमीला हालदारी मंदिरी जिनदेव हा आसवांना तापवूनी…