Category: marathi kavya

  • ओंडका – ONDAKA

    झोपावया सुखाने लाटांस अंथरू आहेच ओंडका मी नाहीच पाखरू गागालगा लगागा गागालगा लगा आहे लगावली तिजलाच वापरू मात्रा इथे किती ते मोजून सांगते बावीस त्या बरोबर त्यांनाच सावरू शेरात या कशाला मम नाव मी लिहू हा शेर टोचरा जर आहेच गोखरू जलदापरी सुनेत्रा ओतून घागरी अर्थास र्सार्थ करण्या देहास मंतरू

  • शुक्र – SHUKRA

    धीर वीर शुक्र वार धीर धीर शुक्र वार वीर्य वंत धैर्य वंत धीर मीर शुक्रवार शौर्य दाखवाच आज धीर तीर शुक्र वार वेड तारणार काय धीर पीर शुक्र वार वेगवान मी प्रवाह धीर नीर शुक्र वार

  • लकी – LUCKY

    लकी वार तारीख ही निळी जिन खिशाची वही खिसा मी कशाला शिवू जुळे तो चिकटवूनही हळू मोज मात्रा बरे लगागा करूनी सही कलश शुक्रवारी कनक करू कार्य तेरासही जगा आणि जगवा जिवा क्षमाशील आहे मही गझल मैत्र मैत्री जिथे तिथे काव्य तरल तरही उखड अंधश्रद्धा पुऱ्या मुखी घाल साखर दही लिहावीच बाराखडी हु हू हो…

  • दुलई – DULAI

    नववर्षाचा हरेक दिन हा … नित्य नवी मज देतो ऊर्जा… सूर्य उगवण्या आधी माझी … सळसळण्या बघ लागे ऊर्जा .. . काय लिहू मी आज नवे रे.. चैतन्याने भरून वाहण्या … ? प्रश्न मला हा कधी न पडतो… …. … …. .. .. . .. . .. .. साकी भरते माझा प्याला…. साकी भरते माझा…

  • दोषग्या – DOSHGYA

    आत्मदेव म्हण सतत दोषग्या आत्मसाक्ष बघ सतत दोषग्या गालगाल गा गाल गालगा आत्मधर्म स्मर सतत दोषग्या कोण काय तुज कौल मागते आत्म बोल धर सतत दोषग्या पेटले सरण त्यात फेक रे आत्म रंग तव सतत दोषग्या लोक धर्म जाणून बोलती आत्म नेत्र मम सतत दोषग्या सात तत्त्व जैनी दिगंबरी आत्म बोल टिप सतत दोषग्या सोनियात…

  • चहाडी-CHAHADI

    आज कोणती नेसू साडी प्रश्न मला ना अता पडेआज चालवू कुठली गाडी प्रश्न मला ना अता पडे जीव जगावे इतुकी इच्छा सदैव माझ्या मनी वसेआज लुटावी कुठली वाडी प्रश्न मला ना अता पडे बाड धाडले कुणीतरी मज रंगबिरंगी रद्दीचेआज कोणते पुस्तक बाडी प्रश्न मला ना अता पडे ताडी माडी नीर गाळणे धंदा माझा प्रिय मजलाआज…

  • रब – RAB

    असशिल तू जर कलम कसाईमी संजीवन अक्षर साई रदीफ आहे सवे काफियाशब्द अब्ज नव मम रब साई स्वर काफियाच अन स्वर बाराअसिआउसा ओम म्हण साई कर्त्याच्या वारी शनिवारीमला प्रिय तव आर्जव साई मांगीतुंगी गजपंथालाजाय सुनेत्रा हाच वसा ई