Category: marathi kavya

  • डंडाथाळी – DANDA THALI(STICK AND PLATE)

    महागाई … शेपू चाकवत कांदापात चुका चवळई टमाटर भात मेथी करडई कोथिंबीर महागाईनं आणला वात खाऊगल्ली … खाऊगल्ली गल्ल्या बोळे पत्रावळी अन शेणगोळे साफ सफाईनं तोंडा फेस कर्मचाऱ्यांची काटे रेस डंडाथाळी… चिकन मासळी अंडा थाळी मटण भाकरी हंडा थाळी वाजवायला थाळी डंडा एक नंबरी फंडा थाळी मुक्तक चारोळी मुक्तक /१६मात्रा

  • अधिकोत्तम – ADHIKOTTAM (MORE EXCELLENT)

    विदग्धातली मी चतुराई आत्मसात केली अधिकाधिक शुद्धता वाङ्मयी आत्मसात केली अधिकोत्तम पण झुकता सुंदर बाकदार झाले वर्दीमधले अधिकारी मन टोकदार झाले… मूर्तिमंत सौंदर्य सत्यता तमा तळी झळकता मार्दव आर्जव घडीव सौष्ठव अंगांगी उमलले शुचितेमधला परिमल प्राशुन मन पुलकित झाले सरळ अंतरी संयम ठेवुन क्षमाशील झाले .

  • कार्यकारणभाव – KARY KARAN BHAV (CAUSE AND EFFECT)

    कार्यकारण भाव जाणू सृष्टिचे विज्ञान जाणू रोखण्यास्तव कर्मबंधन संवराचे कार्य जाणू जीव पुद्गल वेगळेपण अंतरी ध्यानात जाणू निर्जरेच्या साधनेला तपवुनी देहास जाणू धर्म जीवांचा अहिंसा हे सुनेत्रा सत्य जाणू

  • कामधाम – KAM DHAM (WORK HOME etc)

    नगर ग्राम शेत छान रे गाळ घाम शेत छान रे (जमीन मतला ) धरण पानशेत छान रे काळ काम शेत छान रे (हुस्ने मतला) काम धाम शेत गावकी वेळ दाम शेत छान रे एकसाथ राबतात दो डाव वाम शेत छान रे रे त अर्थ शोधला बरा साम पाम शेत छान रे अश्व वेग घोडदौड तव…

  • उद्योग – UDYOG (BUSINESS)

    नादबिंदेस्वरू ……. . हळदुली झग्याचा घोला आणिक .. … कैक अलिकुले पदरावरती ….. . शिव सत्य खजांची रत्नत्रय धन .. … कनक नवलखे पदरावरती ….. . मुरुकुला शबाबी देह निसुंदी .. … नाद अनाहत तरल धुक्यातुन ….. . प्रकटता तरोहण अंचल बोथी .. … समोसरण घे पदरावरती ….. उद्योग ……. घासुनी खंगाळते बघ .. काम…

  • चौकस – CHOUKAS (ATTENTIVE)

    बंध बांधतात जीवाला संसार मग सुरु होतो, भावभावनांचा आस्रव होता पालवी फुटुन हिरवा होतो. नातीगोती फांद्यांसमान पानाफुलांनी बहरून जातात, सहा ऋतूंचे चक्र त्यातून हळूहळू फिरत राहतात. मातृपितृधर्म स्मरून सहज व्हावीत कर्तव्ये, व्यवहार निश्चय जपत जपत सांभाळावे घर आपले. कधी थोडे कठोर व्हावे स्वतःस शिस्त लावावी, हृदयामधले मंदिर मूर्ती ध्यान लावून पाहावी. आपलेच कर्म आणि इच्छा…

  • शिशुपण – SHISHUPAN (BABYHOOD)

    पुराण इतिहास भूगोल वाचत लिहावं पुस्तक असं वाटतं, कुणी नाही वाचलं तरी परत परत लिहावं वाटतं. दशपदीतल्या दहा ओळींचे कशाला मोजावे काने मात्रे, लय पकडुन अक्षरांवर ओढावे खुशाल सहज फराटे. काटे फराटे बरे असतात सलामत ठेवतात गुपित जपून, सरसर झाडावर झटकन पटकन जाते जशी खार चढून, अजुन अजून अजून म्हणतं बाळ चॉकलेटचा हट्ट धरून, समजावून…