Category: marathi kavya

  • तिप्प शांत – TIPP SHANT

    नखशिखांत मी यशात न्हाले मज न भ्रांत मी यशात न्हाले गीत लिहितसे स्वतंत्रतेचे हृदय प्रांत मी यशात न्हाले उदकचंदनी नऊ रसांसह तिप्प शांत मी यशात न्हाले मेघ जलद वा बनून जलधर घन सुखांत मी यशात न्हाले रंगवून मम अलक सुनेत्रा गझलकान्त मी यशात न्हाले शब्दार्थ तिप्प – तृप्त सुखांत – सुखी शेवट अलक – अती…

  • गडे – GADE

    कप अन बशीला सांग गडे कारण पिशी का भांग गडे शब्दच अडूनी मूक बसे काव्य न कधी विकलांग गडे लगावली – गागा/लगागा/गाललगा/

  • झेप – ZEP

    निळसर अंबर चाफा कोमल कळ्याफुलांची झेप नि परिमल झळके वनराई … मोद विखरुनी ठाईठाई .. झळके वनराई … चिंब चिंबल्या फांद्यांवरती चिमणपाखरे किलबिलणारी झुले लता जाई … मोद विखरुनी ठाईठाई ..झुले लता जाई … रानफुलांचा हळदी वाफा तृणपात्यांचा हिरवा ताफा गझलगीत गाई.. मोद विखरुनी ठाईठाई ..गझलगीत गाई मुग्ध रक्तिमा अधरी गाली भाळावर पूर्वेच्या लाली सळसळे…

  • बिटवी – BITVEE

    भाग्य लिहाया भाळावरती कधी न येते सटवी बिटवी उडता उडता हेच सांगते टिवटिवणारी टिटवी बिटवी मकर संक्रमण सणास कोणी जित्राबांना हाकत येता किराण्यातले वाण लुटूनी अंधाराला पटवी बिटवी नको जीम अन नकोच डायट कामे करते मस्त जेवते रहाट ओढून पाणी भरते वजन बरोबर घटवी बिटवी फटाकडी ना बॉम्ब फटाका वाहन भारी तयात बसुनी मजेत सारी…

  • बॉम्ब लाट – BOMB LAAT

    बॉम्ब लाट फिरत होती बोंब ठोक म्हणत होती घाम रक्त होत शाई नीर क्षीर झरत होती गूढ गोष्ट शोधताना वीर वाट मळत होती कर्णवीष वीटधारी ढेकळांस चिरत होती मधुघटात काव्य भरता चिंब चिंब भिजत होती लगावली – गाल/गाल/गाल/ गागा/

  • शब्दविन्यास – SHABD VINYAAS

    शुद्ध आत्म्यातून उमटे मंत्रशक्तीची कला साधना स्वर व्यंजनांची ईशभक्तीची कला शब्दविन्यासात दर्शन मातृकादेवी तुझे जीवनातिल सत्य आर्जव जीवमुक्तीची कला संयमाने मार्दवाचा धर्म रुजण्या अंतरी मम क्षमेने शिकविली मज क्रोधभुक्तीची कला काफिया नि रदीफ यांचे वेगळेपण जाणण्या वर्णमालेतिल तिरंगी गझल युक्तीची कला अंतरी जे प्रीत जपती लीलया तिज पेलती झोकुनी देती स्वतःला ती न सक्तीची कला

  • कुरल -KURAL

    गझलेसाठी गझल हवी .. सृष्टीसम ती कुशल हवी … वरवर वाटे कुरल जरी .. अंतरातुनी सरल हवी… जरी दाटते गच्च मणी .. झरताना पण तरल हवी … नको कोरडी ठक्क बरे .. जलदासम ती सजल हवी … गझल सराईत गझल नवी .. नित्य वाटण्या नवल हवी …