Category: marathi kavya

  • नुक्ता – NUKTAA

    हिंदी उर्दू ग़ज़लेमध्ये नुक्ता भारी मराठीतला शब्द स्वस्त मग सस्ता भारी गज्जल झाली गजल गज़ल अन गझल शेवटी या नावास्तव काढल्यात मी खस्ता भारी लगीनघाई खरीखुरी ही आली बाई गझलदालनी काढ भरजरी बस्ता भारी रम्य हवेली माझी आहे तिथे जातसे वळणावळणाचा गाणारा रस्ता भारी तिरंग्यातल्या रंगी बुडवुन इथे सुनेत्रा फिरव लेखणी सहज उमटण्या मक्ता भारी

  • बाण वायू – BAAN VAAYOO

    ग्रास मुखातिल उदरी नेई निळसर हिरवा प्राण वायू रक्ताभिसरण सहज करितसे लाल तांबडा व्यान वायू विनय नम्रता सौजन्यादि भाव वाहता अंतरातले मस्तिष्काला शांत ठेवतो धवल निर्मल उदान वायू दृष्टी वाचा तनमन बुद्धी इंद्रियांसह तोल साधण्या देहामधल्या मळास ढकले कृष्ण श्यामल अपान वायू उदरामधले अन्न पचविण्या लोहाराचा जणू भाता अग्नी फुलवे नाभीमधला पीतवर्णी समान वायू भूमीवरती…

  • चुक्ती – CHUKTEE

    केल्यावर तुज सक्ती मीही बाकी केली चुक्ती मीही खूप पाहिली वाट म्हणाया हवीच मजला मुक्ती … मीही नवल वाटते दगडाचीही केली होती भक्ती मीही स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी वाढविली मम शक्ती मीही नाव ‘सुनेत्रा’ सिद्ध कराया कधी करितसे युक्ती मीही

  • विराम – VIRAAM

    नशिबाची ना हुजरी मी रे;प्राक्तन बिक्तन गुलाम माझे .. म्हातारी ती गतकालातिल;आज तरुण ‘मी’ विराम,माझे … माजी बाला आजी तरुणी;भविष्यातली होते वृद्धा .. अवघ्या तरुणाईची आई;काळाला या सलाम माझे … बुद्धीजीवी ज्ञान वाटती;ज्ञानच लुटती ज्ञानासाठी .. कसणाऱ्यांच्या हाती बंदे!खणखणणारे छदाम माझे … त्रिलोकातली दौलत सारी…….हृदयी माझ्या भरून वाहे .. ब्रह्मांडातिल सुख शांतीमय;त्रिभुवनी पावन धाम माझे…

  • पर्णकंकणे – PARNKANKANE

    पर्णकंकणांचे किणकिणने मला सांगते शिशिरामागुन वसंत येतो गडद पारव्या तलम धुक्यातुन डोलत झिंगत दवास प्राशुन वसंत येतो चिवचिव कलरव खग फांद्यांवर बोल बोलती दिन सोनेरी आले आले तेव्हा गरगर स्वतःभोवती लहरत थिरकत वाजवीत धुन वसंत येतो हलधर शेतामध्ये फिरुनी इच्छांसंगे बीज पेरता घाम सांडता दहिवर शिंपित मातीमधल्या भिजल्या रुजल्या कणकणातुन वसंत येतो बदल बदल काळाच्या…

  • स्वाध्याय – SWAADHYAAY

    असे नित्य स्वाध्याय पंचेंद्रियांचा खेळ वचन मन काय पंचेंद्रियांचा दोन कान दो सुनेत्र शुद्ध भावना नको धरू तू पाय पंचेंद्रियांचा

  • देहबोली – DEH-BOLEE

    निळा रंग आभाळाचा मनात जेव्हा उतरत जातो.. नयनांमधल्या निळ्या डोहात हळूहळू पसरत जातो पंख पसरून मुक्त पाखरे झेप घेतात नभात जेव्हा मन गाणे गात गात हिंदोळ्यावर झुलते तेव्हा हिंदोळ्यावर झुलता झुलता तरल होऊन शब्द काही नकळत अर्थ देऊन जाती देहबोलीला दिशात दाही डोळे बोलतात अधर विलगतात शब्दांमधला पकडून भाव तरल धुक्याच्या पडद्याआडून हाका मारतो अनाम…