Category: marathi kavya

  • डर – DAR

    जीव स्वयंसे नाहि हरता ना डर लगता शरीर से वो नाता रखता ना डर लगता पुछताछ करनेको किसकी कुछ कुछ पाकर जब जब खुद वो खुदसे डरता ना डर लगता

  • चंचल बाला – CHANCHAL BAALAA

    हौदात जलावर धरता साय कधी पाहून सुखाने हसते माय कधी ती चंचल बाला बनुनी खळखळता पाऊस उतरतो धरण्या पाय कधी

  • निर्मल – NIRMAL

    मी लिहीत आहे मुक्तक गझला गाणी झुळझुळते गाते त्यातील निळसर पाणी पाण्यावर डुलते एक कागदी नाव गाठण्या स्वप्नीचे निर्मल सुंदर गाव

  • गोमटी – GOMATEE

    एवढ्या गर्दीत होते एकटी जाहली जाणीव पण ती शेवटी ते मला म्हणतात ताई का बरे मी जरी आहे तयांहुन धाकटी जर रजा आहे हवी तर वाज रे मोकळे बरसून वेड्या घे सुटी सर्वजण म्हणतात मजला सावळी फक्त प्रियला वाटते मी गोरटी मी तुला सांगेन जे ते ऐक तू मी खरेतर गोरटी ना गोमटी

  • मनोगते-MANOGATE

    मनात माझिया तुझ्या तसेच ते असेलही नसेलही तुला खरे कळूनही वळे न ते असेलही नसेलही हवेत मस्त गारवा तशात गात चालले धुके निळे तुला न का मलाच ते लपेटते असेलही नसेलही कधीतरी कुठेतरी तुला निवांत भेटण्यास यायचे कशास ही खुळ्यापरी मनोगते असेलही नसेलही दवात चिंब न्हायल्यावरी तुला दिसे कुणी जळी स्थळी विभोरता तुझी हवी मला…

  • जीवनभक्ती – JEEVAN BHAKTEE

    कटू सत्य आम्ही प्राशियले तुम्हीही प्राशून पहा पचल्यावरती पचले आम्हा असे खरे बोलून पहा जीवनभक्ती कळण्यासाठी सत्य घोळवुन माधुर्यात मृदूपणाने कसे उतरते नकळत कंठातून पहा पुण्य जाळुनी उदाधुपासम सुगंध भरता तनीमनी तपवुन देहा उपवासाने संयम गुण जाणून पहा कुणी एक जगतास फिरवितो भ्रम डोक्यातुन त्यागुनिया अंतरातल्या प्रतिबिंबाला अकिंचन्य होऊन पहा खूप जाहले शोधुन भटकुन पाषाणी…

  • डोस – DOS(DOSE)

    मोक्षपथावर कधी न अडले घोडे माझे मम चरणांची वाट पाहती जोडे माझे खूप ऐकले उपदेशाचे डोस जनांचे ऐकत असते मीही आता थोडे माझे घात टाळण्या घाटामधल्या वळणावरती मोहक वळणे घेता अक्षर मोडे माझे मीच घातले होते मजला जे अनवट ते लयीत लोभस सहज उलगडे कोडे माझे गंडेदोरे का नडतील ग मला सुनेत्रा करी झळकता कनक…