-
तरू प्रीतिचे – TAROO PREETICHE (the tree of love)
In this poem the poetess says, today my mind became very very soft, fragnant and cool. आज किती मी कोमल बनले शीतल आणिक सुरभित बनले दवात भिजवुनी शुष्क पाकळ्या सुगंधीत मी फूल बनविले शुभ्र गुणांचे बीज पेरले मातीमध्ये अर्थ मिसळले भावजलाने त्यास शिंपले तरू प्रीतिचे वरती आले पर्ण फुलांनी बहरून गेले मांडव घालुन जाळीदार मी स्वतःच…
-
मैत्री – MAITREE (friendship)
In this Ghazal the qualities of a true friendship are described. मैत्री माझी बंधन नाही पण जुळलेले कर मैत्री प्राजक्ताच्या देठावरल्या दवबिंदुचा सर मैत्री मधुरा-भक्ती अबोल प्रीती वत्सल नाती जपावया मृदेत भिजल्या बकुळ फुलांच्या प्रेमाचे अत्तर मैत्री एकांताच्या बाकावरचे पारावरल्या गप्पांचे चिवचिवणाऱ्या आठवणींचे गजबजलेले घर मैत्री पहिली मैत्री पहिली प्रीती पहिले जे जे शुद्ध खरे…
-
कविता माझी – KAVITA MAZI ( my poem)
-
कर्म निर्जरा – KARM-NIRJARAA (removal of accumulated karma from the soul)
डोळ्यांस पाजुनी भांग, मी प्रेम न तुजवर केले पाण्यात पाहुनी सांग, मी प्रेम न तुजवर केले पोळ्या न भाजल्या लष्करी, सोडून कामधंदा कामास देउनी टांग, मी प्रेम न तुजवर केले घडवून वेगळी वाट, नेटाने चालत गेले मोडून नेटकी रांग, मी प्रेम न तुजवर केले धोंड्यास फोडुनी सूक्ष्म, मी कर्म निर्जरा केली गर्वात फेडण्या पांग, मी…
-
कोल्हेकुई – KOLHEKUI (the howling of jackals)
-
घरात मी – GHARAAT MEE (am in the house)
The poem ‘Gharaat mee’ is based on the poem ‘Havaas too(हवास तू गीत-जगदीश खेबुडकर संगीत-सुधीर फडके स्वर-आशा भोसले चित्रपट-आम्ही जातो आमुच्या गावा). This poem is a parody poem or Vidamban kaavya(विडंबन काव्य) घरात मी, भरात तू, करात मज तू, हवास तू विमानातुनी, मम काव्याची, काढशील का, वरात तू फुलांपरी मम, कोमल गझला, वामा विमला, श्यामा…
-
मद्यपी – MADYAPI (DRINKER)
थाळीभवती कितीक चमचे तू तर काटेपळी … किती हुडकिशी तव काट्यांनी या थाळीच्या तळी ? पळी रुपेरी म्हणे वाढप्या, “शिकार दिसते बरी! चिनी जपानी खाद्यामधली जाड शेवई खरी” “तर्र मद्यपी अंधारातही चोरतील ग तुला” म्हणे वाढपी पळीस टोचऱ्या “नकोस टोचू मला! भुलून गेलो तुज पुसताना तुझिया रंगावरी, खरी तरतरी दिसे सुंदरी माझ्या गालावरी”