Category: Marathi sahitya

  • रत्न – RATN

    जसे रत्न कन्या तसे पुत्र सुद्धा जशी माय कारण तसा बाप सुद्धा जसा गाळ साठे तसे पात्र बनते जसा लेक कडवा तशी लेक सुद्धा जरी कायद्याने तुला हक्क मिळतो जशी लेक गिळते तसा लेक सुद्धा जसा हात मारू तसे द्रव्य वाहे जशी पुण्य धारा तसे नीर सुद्धा जसा एक आत्मा तसे कैक आत्मे जशी मी…

  • भवंदाज – BHAVANDAJ

    दर्पणी माझिया मौन अंदाज तू लक्ष्य भेदून जाई तिरंदाज तू स्वच्छ ऐन्यामधे बिंब तव श्रीमती आरसा नीर वारा घरंदाज तू शांतता चारुता चंद्रमा अंबरी त्याग मिथ्यात्व अन घे भवंदाज तू डाव दांडू चिनी भारती इंग्रजी उडव तू झेल तू हो गुलंदाज तू मार चौकार रे सा लिही गावया ठोक छक्का सुनेत्रा फलंदाज तू

  • बुमरँग – BOOMERANG

    नवरी मोजे नऊ दिवस नवे नव्याचे नऊ दिवस घट मातीचा धान गहू उगवे वाढे नऊ दिवस चैत्रामधल्या नवरात्री वसंत नाचे नऊ दिवस मेंदी हळदी चुडा मणी झेल टोमणे नऊ दिवस कर्मकरंट्यांना बडगा नव्व्याणवचे नऊ दिवस हाव दागिन्यांना चाटे सोसत फटके नऊ दिवस कौटुंबिक हिंसाचारी मूळ पोसले नऊ दिवस सैल जिभांना आवळता पुरते जिरले नऊ दिवस…

  • डांग – DAANG

    तीन मुक्तके ………….. भोचक …. ओगराळ वा वरंगळी जर तुला वाटती भोचक बीचक अर्थ सांग तू धारेवरचा धारेवरुनी खोचक बीचक खंगाळुन घे धारेखाली घासून फळीवरली भांडी ऊन फाल्गुनी झेल तयांसव अनुभव घेण्या रोचक बीचक डांग…. टांग मारली ठरव कुणी डांग गाठली कळव कुणी अंग आंबता कळकटता भांग पाजली ग तव कुणी सद्दाम ….. मडके फुटले…

  • माला -MALA

    हात देण्या नेक ताली राहण्या त्यागिली मी ती रुदाली राहण्या सूर ठेका लय स्वराची साधना गालगागा गा गझाली राहण्या शांत जागा अंतराळी शोधली मौन कर्तव्ये खयाली राहण्या शांतता आत्म्यात माझ्या नांदते निवडली ऐसी प्रणाली राहण्या सत्य मी जाणे सुनेत्रा जाणती माळ माला माल माली राहण्या

  • हवाला – HAVALA

    ठाम निश्चयी दृढतम श्रद्धा कशास पाळू अंधश्रद्धा दुजांवर ठेवूनी पाळत स्वतःसाठी कुणी खोदे खंदक बिनबुडाचे भांडे चुलीवर कशास नाटक व्यर्थ आगीवर निर्जरेस मज कर्मे माझी पराकडून ना घेते आंदण स्वार्थी लंपट मित्र नव्हे ते ते तर शत्रू तुटते बंधन लांछन बिंछंन नाद कशाला मम कर्मांचा मला हवाला बदफैल्यांचा माज पोसुनी म्हणे सोवळा स्वतःस कोणी सोबत…

  • घटना ग्रंथ – GHATANAA GRANTH

    पंचोळी … घटना घटना असुदे अथवा घट पट त्यांस असावा प्रकृतिचा तट मातीवर संस्कार करूनी घट संस्कारित कुंभाराच्या हाताचा आकार झेलूनी मृत्तिकेतले उपादान साकार जाहले… तीन शेरांचे मुक्तक ..ग्रंथ काल खेळली रंग लेखणी मस्त खरा आज चाटुनी कोप नाचरा फस्त खरा काय शिकविते गझल ओळखू सार बरे मित्र जवळचा ग्रंथ सत्य आश्वस्त खरा रंगवायला चित्र…