Category: Marathi sahitya

  • हे झाड सांगते गुज मला ! – “This tree is telling me its secrets”

    हे झाड सांगते काय मला `.. कथा सांगते जणु मजला.. गुजगोष्ट सांगते  मला… पानांच्या ओठातुन हसते..हळुवार सळसळते सांगते.., ” या दगडी भिंतींचा भक्कम शेजार मला! प्रभातीस हे ऊन कोवळे ..भाद्रपदातील .. खेळते बागडते माझ्या देहावरती ..या दगडी भिंतींवरती.. इथल्या भूमीच्या कणकणावर …मुक्तपणे…! हवा वाहते शीतल झुळझुळ … परिमल भिजल्या पानफुलांचा…ओल्या खोडांच्या सालीचा .. अन मातीचा…

  • क्षमा भाव गुण – “The virtu of forgiveness”

    जास्वंदी की जपा म्हणू मी कुक्षी की कुंडले स्मरू मी रंग गुलाबी केसर कणकण बीज मण्यांना कसे धरू मी कणकण वाटे तुज तापाची यावर कैसे बरे हसू मी दुभत्या भाकड जित्राबांनां खाटकास का विकू झुकू मी जीवास देते जीव अश्या मम लेखणीस का म्यान करू मी सुजला सुफला देह संपदा जमीन फुंकुन का टाकू मी…

  • सुखद गारवा – “pleasant coolness”

    पीत गुलाबी दल पर्णांकित खोड उभे पाठी नाजुक कुसुमांच्या रंगांच्या सोडविण्या गाठी झाड फुलांनी भरून गेले पानांची गर्दी हलवुन फांद्या मीच पाडला पाऊस माझ्यासाठी भल्या पहाटे सुखद गारवा हवा लपेटुन तना भिजल्या वाटेवरुन जातसे गात पुढे मी मना मना तुझिया संगे करते मी गप्पागोष्टी मोर कोकिळा साद घालती संवादासाठी चला उमटू द्या अंतरातुनी हवेहवेसे गीत…

  • जीव सृष्टि -living beings

    पृथ्वी कायिक जीव सृष्टि गोवा दमण व दीव सृष्टि करुणा ममतेची मूर्ती पण ना करते कीव सृष्टि स्पर्श कराया प्रीतीने दोन करांनी शीव सृष्टि वृक्ष तरू तण एकेंद्रिय पुद्गल द्रव्य अजीव सृष्टि निसर्ग मानव ग्रह तारे उत्क्रांतीची नीव सृष्टि

  • मडगार्ड – MUDGUARD

    मडगार्ड की पडल मडी घोंगावते बझल मडी गा गा ल गा गा गा गा सोडव खरे पझल मडी राजीव नयनातिल जल प्रक्षाळते गझल मडी पैंजण पदी छुमछुमती फुलले पहा कमल मडी कळ कमळ दाबा सत्त्वर वाटेकरी अडल मडी    

  • पान – page

    मंगल आहे मंगळ वार मंगल साहे चंगळ वार अंगण झाले गंधित पान मंगल पाहे टंगळ वार अंजुम बोले मंजुळ बोल मंगल वाहे अंगळ वार कंकर मोती पंकज नील मंगल का हे तंगळ वार दंगल चाले सुंदर छान मंगलता हे बंगळ वार गायन साथी वादन राग मंगल गा हे संगळ वार चंचल नाही श्रावण रात मंगल…

  • होल सोल – WHOLE SOUL

    चारोळी  .. होल गरज वा इच्छा कशाची बांधते तुज मूळ जारण कर्म बे ते मोल आता चार ओळी मुक्तकाच्या ना रुबाई मूळ पारण पारणे ते होल आता गझल ….. सोल मूळ कारण काय जे ते बोल आता मूळ तारण कोण ते ते कोल आता का बरे तू टाळले सांगायचे रे मूळ सारण खोबरे ते फोल…