-
रसना – TOUNGE
-
वनराई – FOREST
भूतकाळच्या सयीत भिजली वर्दळ भूमीताई फांद्या पाने झाडे ओली हिरवळ भूमीताई आभाळातिल मेघ तयांची श्यामल वर्दी गर्दी कोसळून घन निर्झर वाहे खळखळ भूमीताई तनमन रोमांचित करणारी श्रावणसर शिरव्याची उडून गेली अंगांगातिल मरगळ भूमीताई अवतीभवती बागडणाऱ्या पक्ष्यांना प्राण्यांना वेड लावतो मृदगंधाचा दरवळ भूमीताई सुखे गावया कोकिळ बुलबुल वनराईतिल मैना भ्रमरांची नव पानांमधुनी सळसळ भूमीताई
-
जाळीदार – GAUZY
मुक्तक.. १)पैरण सूक्ष्म तंतूंची बनलेली ऐरण जाळीदार.. सूक्ष्म तंतूंची विणलेली पैरण जाळीदार… सागवानी दार घराचे अंगण त्यावर छान.. सूक्ष्म तंतूंची रचलेली वैरण जाळीदार. मुक्तक ..२)स्वच्छता स्वच्छता असावी तना मनाची अन वचनांची, स्वच्छता करावी स्वतः मनाची अन वचनांची. भावना जयांची असेल सुंदर तर नात्यांची .. स्वच्छता धरावी खुल्या मनाची अन वचनांची.
-
धारदार – SHARP
-
व्यापार – TRADE
परवशता ना पाश माझ्या वसा गळा अंतरी देऊळी चित्रात साकार सावळा अंतरी काळ न भोंदू वेळकाढू निकाल सांगायला तो तर दावे कर्म वर्गणा जुन्या कळा अंतरी कशास फिरशी सांग बाई अश्या अवेळी कशी लहरत आहे काळ कर्दन रसा तळा अंतरी रंगांचा व्यापार क्षितिजी कळी फुले संगमी मंतरलेल्या चांदण्यांचा झुले मळा अंतरी गागागा गा गाल गागा…
-
खट्याळ पोर – NAUGHTY GIRL
खट्याळ अवखळ पोर बागडे घरात अवती भवती … पक्ष्यांच्या पंखांवर बसुनी उडते अवती भवती… मजेमजेचे खेळ बेरकी मुग्ध निरागस भाव … वृक्षांच्या राईत तिचा हा निसर्ग सुंदर गाव… गुणगुणते ती मनात रचते अर्थपूर्ण गाणे … वाऱ्यावरुनी वाहत येती तालांकित तराणे … सान गोडुली नात गोमटी खोड्या किती करते .. स्वतः स्वतःच्या रचून गोष्टी आम्हाला सांगते…
-
सुपारी – BETEL NUT