Category: Marathi sahitya

  • तापत्र – TAAPATRA

    जुने पुराणे पत्र गझल नूतन जणु सावत्र गझल निमित्त्य ठरले तव जन्मा बहर काफिया छंद गझल ताप तापता संसारी शांत करे तापत्र गझल बहीण आजी माय सुता सई रदीफ कळत्र गझल तिसरे दुसरे त्याआधी प्रथम सुनेत्रा सत्र गझल शब्दार्थ … तापत्र – कडकी कळत्र – पत्नी,स्त्री

  • सावळे – SAVALE

    मौन टिपण्या सावळे मी मौन झाले माझिया जीवासवे मी मौन झाले चंद्र गोलाकार बघुनी भाकरीचा जाणत्या बकरीपुढे मी मौन झाले जाहले नेते शिकारी गर्जणारे रान ते किंचाळले मी मौन झाले रंग काळा अशुभ लेश्या काळगेले अंकशास्त्री बरळले मी मौन झाले गुंफुनी नावा ‘सुनेत्रा’ शेर लिहिता गुरु गझल घन बरसले मी मौन झाले

  • वाडा – VADAA

    जाहला गोठ्यात वाडा द्रव्य साही खांब भारी अंगणी गातात पक्षी डोंगरी बाबू जमाली हे उसाचे शेत गाते पूर्व पश्चिम जोडणारी उत्तरेला दक्षिणेची साथ मिळता सौख्य दारी

  • भाकीत – BHAKIT

    हातावरील रेषा रेखून राम गेला वेळेत वेळ अपुली पाळून काळ गेला जगणे सवंग होता करतात खेळ कर्मे परधर्म बघ भयावह सांगून कृष्ण गेला पंचांग तू स्वतःचे लिहिण्यास शीक मनुजा रद्दी विकून नोटा लाटून टोळ गेला लोण्यासमान जमिनी झरत्या झळा उन्हाच्या बहरात ग्रीष्म आला कढवून तूप गेला मम शब्द ढगफुटीसम तू झेलता सुनेत्रा भाकीत भेकडांचे उडवून…

  • लवंग …आणि दोन मुक्तके

    लवंग …आणि दोन मुक्तके लवंग जशी आमटी मस्त कटाची तवंग द्रव्यावरी तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी सवंग द्रव्यावरी भावमनाची होडी आली तरून काठावरी अर्घ्य द्यावया पुष्प वाहिले लवंग पाण्यावरी धाव जपणे स्वभाव अपुला काव्यास पण जपावे वृत्तात मांडताना काव्यास पण जपावे घन शब्द अंतरीचे वाऱ्यासवे हलूनी शेरात धाव घेता काव्यास पण जपावे केतू शनी असो वा…

  • आरारुट – AARARUT

    निर्मल मानस लुटते मी णमो णमो पुटपुटते मी पाप पुण्य तोलते तुला शून्य बनूनी सुटते मी अलगद फिरवुन बत्त्याला खली वेलची कुटते मी जलद दाटता गच्च नभी जशी ढगफुटी फुटते मी बंधमुक्त होऊन जगे ताणत नाही तुटते मी पचावयाला बाळांना हलके आरारुट ते मी पाण्यावर फिरवुन बोटे सहज उमटते स्फुट ते मी

  • तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी – TUZI TULA LAKHLABH PRASIDHHI

    तुझी तुला लखलाभ प्रसिद्धी सवंग कीर्तीवरी काठ चुंबण्या लयीत विरती तरंग कीर्तीवरी कैक भोवरे गरगर वरती बुडून येता क्षणी नकळत उठते खळखळ सळसळ अनंग कीर्तीवरी नाठाळाचे माथी काठी सम्यक श्रद्धा उरी गाथांमध्ये तरंगणारी अभंग कीर्तीवरी बिंब पहाया मुनीमनासम निर्मळ सरोवरी बनी केतकी सुगंध उधळे दबंग कीर्तीवरी फक्त माझिया आत्म्याला मी रक्ष रक्ष म्हणते पाप पुण्य…