Category: Marathi sahitya

  • टाळी – APPLAUSE

    वाऱ्याच्या वेगे आभाळी घन वर्षाया येती डोंगर माथ्यावर विश्रांती जमून येण्या घेती पश्चिम क्षितिजी केशरकांडी कृष्ण ढगांतुन फिरता संधीकाली सूर्यास्ताची घटिका उधळे रेती अधिकामधला वाण पाऊस फोडुन वादळ येता कडाडणाऱ्या जलद मेघना विजेस टाळी देती मुसळधार जलधारा शीतल थेम्ब टपोरे मोती संशय शंका धो धो धुवुनी शुभ भाव फळे देती रत्नत्रयमय ज्ञान संपदा पुरुषार्थाची जादू…

  • मुखडा – FACE

    शुभाशुभाची वर्दळ वावर न्याहाळू अंतरा शुद्ध भाव राहण्यास स्थावर प्रक्षाळू अंतरा मुखडा आणिक अंतऱ्यातला फरक जाणल्यावरी हलके हलके मिटेल अंतर सांभाळू अंतरा गझलेमधला रदीफ जैसा पुन्हा पुन्हा येतसे ऐसा जणू तो मुखडा वत्सल मायाळू अंतरा गझलियतीसह काफियातील अलामतीचा मणी चित्रांकित रत्नत्रय हृदयी गंधाळू अंतरा हिऱ्याप्रमाणे नाव झळकते सोन्याच्या कोंदणी पुरुषार्थाच्या दली उमलतो लाजाळू अंतरा

  • नीव – BASE

    परिणामस्वभावी जीव असे भाव जसा हृदयी परिणमताना शुभाशुभातुन तोच पसा हृदयी आर्जव मार्दव सत्य अहिंसा ब्रम्हचर्य कळसा शुद्धभावरुप क्षमा नीव मन सिद्ध वसा हृदयी

  • नवनगर – NEW CITY

    चित्र रेखिले चित्र बनविले बुद्धीपूर्वक भाव मनीचे सहज सहज मम त्यात प्रकटले .. मुनि हृदयीचे उदक शिंपडुन वेलीवरती मात्रा मोजत खुडता पाने हात प्रकटले….. श्रीगोंदा नवनगर जाहले यतिभंगाने यती कोपता आठवणींची अर्पुन ओंजळ .. जिनवाणीचा सार प्राशुनी रक्षायाला वृक्ष वाटिका मगरीचे दो दात प्रकटले …..

  • कथा – STORY

    कुठे जायचे ते मला वाट सांगे  कितीदा वळावे निळा घाट सांगे फुले जांभळी वेचण्या वात शीतल  कळीची खळी चुंबण्या लाट सांगे तरल आवडी सावळ्या तव कळाल्या  सुखाने तुला जेवण्या ताट सांगे गुणांशी करायास व्यापार पक्का  सदाचार माळू हळू धाट सांगे जरी पायवाटा उन्हाने जळाल्या  बरसण्या सरळ जळ वळ चऱ्हाट सांगे पहाटे भिजूनी तळी चिंब पाने …

  • पूज्य – VENERABLE

    शांत चित्त व्हावयास जपेन अंतरी जिनास निसर्गात ईश्वरास जपेन अंतरी जिनास जाप द्यावयास नित्य स्मरेन मूर्त वीतराग शुद्ध भाव आस ध्यास जपेन अंतरी जिनास काय वचन आर्जवात जिनालयात आसनात क्रोध लोभ त्यागण्यास जपेन अंतरी जिनास अंतरंग मार्दवात धरेन नाम पूज्य सिद्ध शौच सत्य संयमास जपेन अंतरी जिनास गोष्ट आगमातली जुळवून ठेवली मनात सत्य सार जाणण्यास…

  • कारंजे – FOUNTAIN

    नयन मनोहर कारंजे तुषार सिंचन उदक पडे किती खोदशिल खोल दरी किती दिवस हा खेळ गडे चंदन मात्रा उगाळुनी बाराखडी ग गझलेची जिनेश्वरावर स्तवन स्फुरे छत्र धराया नाग फडे जमीन आणिक शेर गुणी सहज जुळावे पंचांगी रत्नत्रय हृदयात वसो जाणण्यास व्यापार धडे निसर्ग गाथा गात रहा जिनायतन मन साथीला अभिषेकास्तव प्रतिमेच्या भाव जलाचे पूर्ण घडे…