Category: Marathi sahitya

  • हिंदोळा – HINDOLA (SWING)

    घन करवंदी डोळा सखया झरणारा हिंदोळा सखया मुठीत नाही रहावयाची मी बर्फाचा गोळा सखया खेळशीलका जपून धुळवड सण बैलांचा पोळा सखया गोड रसाचे गुऱ्हाळ वाजे इक्षू चोळामोळा सखया भांग समजुनी पितोस लिमका किती किती तू भोळा सखया म्हणू नको ना तिला बहकली वय गझलेचे सोळा सखया

  • आठवण – ATHAVAN (RECURRENCE)

    आठवण दवात भिजली माझिया अधरी हसली कसा मी रुसवा काढू ओढून घुंगट बसली

  • चोपडी – CHOPADEE(THE OLD NOTEBOOK)

    In this Ghazal the poetess says what she really wants. she wants a small but clean house which has windows and doors. She wants the home which gives ‘space’ to every member of the family. she says, my words are like fragrant flowers. In this Ghazal kafiyas are: zopadi(clean airy home made of banbu-sticks, and…

  • दिवाळी – DIWALI (FESTIVAL OF LIGHTS)

    Diwali is the festival of lights and it brings happiness. ”गाते पृथ्वीवरी या दिवाळी” मूळ गीत- आली माझ्या घरी ही दिवाळी गाते पृथ्वीवरी या दिवाळी सप्तसुरांच्या गंधाने न्हाली स्वप्न मुग्ध हसे डोळियात वसे रूप आठवून मन वेडेपिसे कोर चंद्राची माझिया भाळी कधी गुलाब तू कधी पारिजात भिजु देना मला तव वर्षावात गाली हसतील शेतात साळी…

  • तमातसुद्धा तुला पाहते – TAMATSUDDHA TULA PAHATE (IN THIS DARKNESS OF BLIND BELIEFS I AM WAITING FOR DEAR SHRAVAN LAMP)

    This Ghazal is Gair-murraddaf Ghazal. Kafiyas are Mor, Por, Chor etc. रजनीगंधा उमलत जाता नववर्षाचा नाचे मोर सरत्या वर्षा निरोप देउन निजे जुईची नाजुक पोर पुरे जाहल्या चोऱ्यामाऱ्या हा कंठा घे शेवटचाच शपथेवरती प्रियेस सांगे भल्या पहाटे कोणी चोर काटेरी जाळीवर हिरव्या करवंदांचे लोभस घोस टपटपणारे जलद म्हणूकी नेत्र सई तव काळेभोर वर्षे येती आणिक…

  • ब्रम्हचर्य व्रत – BRAMHACHARYA VRATA (WALKING IN THE DIVINE)

    Here Radif is directly absent but indirectly present. Kafiyas are Bhaaree, Vaaree, Naaree. ब्रम्हचर्य व्रत भारी स्वर्गाची जणु वारी आत्मधर्म जाणतात पुण्यवान नर नारी

  • घायाळ – GHAYAL (SMITTEN)

    This is the poem containing four lines written in the form of Muktak. In this poem Radif and Kafiya are present. स्मरणी ठेवा घरंदाज मी मारिन टोला फलंदाज मी मुक्यानेच घायाळ करावे अशी आगळी तिरंदाज मी