-
सद्दी – SADDEE
ही जरी फोफावली कांही दुकाने जिद्दी पुरी तीच ती काढेन रद्दी उलथवूनी सद्दी पुरी या चला मांडून उकलू प्रश्न जे जे भंडावती सत्य धर्मी मी सुनेत्रा मिथ्य झटके रद्दी पुरी
-
चिटणिस – CHITNIS
लुगडे सारी पातळ शालू अंबर डेपो रे पदर हवायिन काठ भरजरी झुंबर डेपो रे तवंग कचरा पाण्यावरती डासांची अंडी बंद कालवे उघड दावण्या डिम्बर डेपो रे कृष्ण कडप्पा तांबड गडवा जांभरत्न किरीट गुलाब झेंडू रजनीगंधा टिम्बर डेपो रे नांदरुकी वट पाकर पिंपळ वृक्षांवर पक्षी उदूंबराच्या वृक्षतळी फळ उंबर डेपो रे कृष्णे तीरी ग्राम बावची कात्यायनि…
-
कॅनॉल – CANOL
निर्झर झाला म्यूट कॅनॉल कॅनल अथवा रूट कॅनॉल खेचुन पाणी शेतीसाठी भरून काढे तूट कॅनॉल योनि गती की रोग असावा यक्ष प्रश्न हा कूट कॅनॉल दो जमिनींच्या मैत्रीमध्ये नकोच पाडू फूट कॅनॉल रत्नपारखी गुणानुरागी मुनी दिगंबर क्यूट कॅनॉल पूल बांधण्या कॅनल वरती देय सुनेत्रा सूट कॅनॉल
-
वलयांकित – VALAYANKIT
काठ पोपटी पिवळी माया भारी जास्वंदीची त्रयी जपे कळ न्यारी हरित दलावर मणी जणू दवबिंदू बिंदू बिंदू समुद्र सागर सिंधू लाल किरमिजी मृदुल पाकळ्या वलयांकित नव कंच सावळ्या शुभ्र चारुता टपटप पानांवरी पौषामध्ये झरण्या श्रावण सरी
-
पंचपरमपद – PANCHA PARAMPAD
मंगलमय आरास रक्तिमा जणू उगवती लाल मुखकमलावर ओष्ठ भाळ अन लाल जाहले गाल फुटुन तांबडे झुंजूमुंजू दिसू लागल्या दिशा पहाट वारा लुकलुक तारे झरली खिरली निशा हळद माखुनी ऊन कोवळे बागडते निर्झरी नीर भराया जळी उतरल्या तांब्याच्या घागरी बनी केतकी चाफा हिरवा बकुळ फुलांचा सडा सिंहकटीवर सहज पेलते पुण्य सुगंधी घडा मुनी दिगंबर जिनानुयायी पिंछीधारी…
-
विशुद्धी – VISHUDDHI
संकल्पाची जात असावी ठाम निश्चयी संकल्पाला वात असावी राम निश्चयी पुढच्या वर्षी करूच पुढचे आज आजचे संकल्पासह बात असावी दाम निश्चयी व्यवहाराने जगती जगता जीव जपाया संकल्पातच मात असावी साम निश्चयी भरून प्याला जसा सांडतो पुण्य तसे हे संकल्पा तुज कात असावी घाम निश्चयी कर्मनिर्जरा सहज सुनेत्रा अशी विशुद्धी संकल्पावर पात असावी नाम निश्चयी
-
स्तूप – STOOP
टिकटिकणारे घड्याळ काटे चिदानंद चिद्रूप शांत जिनालय मूर्त अंतरी मंदिर स्थानक स्तूप शिवार वावर रान शेत अन जमीन गझलांकीत पाखडती घन शब्द अक्षरे हस्तामधले सूप रुजण्यासाठी उपादान अन निमित्त जुळता योग तडाग तीरी धोंडयावरती आत्मा बीजस्वरूप कैद भावना भ्रमर मनातिल मिटूनी नयन दले कैक काफिये गोळा झाले फार रगड वा खूप साय दही घुसळून सुनेत्रा…