Category: Marathi sahitya

  • वित्त – FUNDS

    तडाग उदरी वित्त आतील वात कफ सह पित्त आतील जादा मात्रा ओक मुखातून शांत शांत तळ चित्त आतील

  • सफेद – WHITE

    ध्येय साध्य लक्ष्य भेद बाण मारुनी उजळले स्फुलिंग छेद बाण मारुनी राख गरम धगधग ठिणग्यात लालिमा ज्योत पेटली सफेद बाण मारुनी

  • पुरुषार्थ – COURAGE

    लोकापवाद ठोक साक्षीस ठेव आत्मा बघतात फक्त लोक साक्षीस ठेव आत्मा सोडून देश प्रांत येतात पाहुणे खग झुंजार माळढोक साक्षीस ठेव आत्मा जाणावयास भेद संस्कृत प्राकृतातिल नमिऊण स्तोत्र घोक साक्षीस ठेव आत्मा सम्मेद शिखरजीस निर्वाण वीस टोके अंतीम पार्श्व टोक साक्षीस ठेव आत्मा दृष्टीस माय नाव दिधले स्वतः “सुनेत्रा ” पुरुषार्थ साध्य झोक साक्षीस ठेव…

  • मदरंगी – THE PLANT

    मेंदी हीना मद मदरंगी पंचम काळ सनद मदरंगी पाटे वरवंटेच जाहले अंधारात बळद मदरंगी जीव अता मम शांत जगाया मनातली खदखद मदरंगी नीरेवरती धरण डोलते नळ नेत्रात पुसद मदरंगी वाटुन पाने तळवे आणिक तुझे “सुनेत्रा” पद मदरंगी शब्दार्थ … मदरंगी – मेंदी (वनस्पती)

  • पूर्व – PREVIOUS

    राखेतुन अंगार फुलवले अंगारातुन नीर प्रकटले कृष्ण जलद डोंगरी ठिबकता शांत रसाने निर्झर झरले काठांवरच्या वाड्या वस्त्या शेतमळ्यांनी श्वास घेतले अकरा अंग सह चौदा पूर्व तीर्थंकर वाणीतुन खिरले वाणीमधले अर्थ टिपाया देह “सुनेत्रा” कान जाहले  

  • पेंचकेस – SCREW DRIVER

    तीर्थ घाट तट प्रमाणिता प्रशम माळ घट प्रमाणिता सूर ताल लय पदावली खण कपाट पट प्रमाणिता संथ वाहत्या नदीसवे सलिल सूक्त रट प्रमाणिता शस्त्र पेंचकेस सहजपणे आवळेल नट प्रमाणिता हर अवयव तर दवा असे मूळ वृक्ष वट प्रमाणिता

  • तैलचित्र – OIL PAINTING

    शांत योग्य वेळ ही फिरावयास जायची गायची कोटरांत पाखरांस ऐकण्यास जायची गायची एक दोन तीन चार पाच आणखी सहा सात रे लीलया लगावली लिहून मज पहायची गायची अंगणात पारिजातकांस हलवण्यास ये वारिया मुग्ध तरल काळ वेल पर्णभार ल्यायची गायची भर दुपार प्रहर दोन वाजले किती बरे नेमके तप्त समय सूर्य पुष्प पीत जर्द व्हायची गायची…