-
ऐवज – AIVAJ
त्रस्त नव्हे पण मस्त मस्त रे स्वस्त नव्हे पण मस्त मस्त रे ऐवज आहे मौल्यवान हा दस्त नव्हे पण मस्त मस्त रे वेळ बघूनी काम साधते व्यस्त नव्हे पण मस्त मस्त रे खात रहाण्या खाद्य पुरविते फस्त नव्हे पण मस्त मस्त रे गझल लिहाया जाग जागुनी गस्त नव्हे पण मस्त मस्त रे कोसळण्या घन वीज…
-
बेण – BEN
सुधारे न मी … पु ट पु ट स्फुट भरुन शेण मी … पुटपुट स्फुट सुके बेण मी … पुटपुट स्फुट दवारेन मी … पुटपुट स्फुट ढळढळीत सत्य जिनविजय खरे देण मी … पुटपुट स्फुट दुजांच्या चुका उणीदुणी उगाळेंन मी … पुटपुट स्फुट पुढे काय ते मध्यस्था विचारेन मी … पुटपुट स्फुट करुन नाक वर…
-
दणका – DANAKA
दोन मुक्तके दणका .. सरळ जिवाचा मणका बिणका गरम भाकरी झुणका बिणका येच एकदा खाण्यासाठी मम सोट्याचा दणका बिणका गुलगोखरू ….. फुलपाखरू फुलपाखरु चल ये धरू फुलपाखरु बाळ्या कुणी म्हणताच ग गुलगोखरू फुलपाखरु
-
उजळ – UJAL
मार फडके व्हावया ऐना उजळ नित्य बस ध्यानास आत्म्याला उजळ अर्थ तव येईल हाती भरभरुन भरत जा आभाळ गगनाला उजळ तू नको घालूस चष्मा ती म्हणे करितसे मेकप दिसायाला उजळ का बरे ऐकू अशी तव बात मी मज मला कळते भले व्हाया उजळ आगमांना कोळुनी प्याल्यावरी तळ सुनेत्रा जाहला माझा उजळ
-
तापत्र – TAAPATRA
जुने पुराणे पत्र गझल नूतन जणु सावत्र गझल निमित्त्य ठरले तव जन्मा बहर काफिया छंद गझल ताप तापता संसारी शांत करे तापत्र गझल बहीण आजी माय सुता सई रदीफ कळत्र गझल तिसरे दुसरे त्याआधी प्रथम सुनेत्रा सत्र गझल शब्दार्थ … तापत्र – कडकी कळत्र – पत्नी,स्त्री
-
सावळे – SAVALE
मौन टिपण्या सावळे मी मौन झाले माझिया जीवासवे मी मौन झाले चंद्र गोलाकार बघुनी भाकरीचा जाणत्या बकरीपुढे मी मौन झाले जाहले नेते शिकारी गर्जणारे रान ते किंचाळले मी मौन झाले रंग काळा अशुभ लेश्या काळगेले अंकशास्त्री बरळले मी मौन झाले गुंफुनी नावा ‘सुनेत्रा’ शेर लिहिता गुरु गझल घन बरसले मी मौन झाले
-
वाडा – VADAA
जाहला गोठ्यात वाडा द्रव्य साही खांब भारी अंगणी गातात पक्षी डोंगरी बाबू जमाली हे उसाचे शेत गाते पूर्व पश्चिम जोडणारी उत्तरेला दक्षिणेची साथ मिळता सौख्य दारी