-
जगण्याची मजा – JAGANYACHEI MAJA (THE JOY OF LIVING)
-
भविष्य माझे – BHAVISHYA MAAZE (MY FUTURE)
-
बाउन्सर – BOUNCER
बाउन्सर माझ्या गझलांमधले शेर तुझ्यासाठी बाउन्सर नकली तुझे फॉर्म्युले केर तुझ्यासाठी बाउन्सर कसले टाकतोस तू सोड खुळ्या नादा बाउन्सर माझे अडकविण्या तुज हेर तुझ्यासाठी बाउन्सर फसवे टाकुन घेशी लाख लाख सुट्ट्या बाउन्सर साठुन भवती झाले ढेर तुझ्यासाठी बाउन्सर कळण्या डोक्यामध्ये हवा नसावी रे बाउन्सर माझ्या भाषेमधले फेर तुझ्यासाठी बाउन्सर आता तुझाच तुजला गरगर बघ फिरवे…
-
दाब थेरपी – DAAB THERAPEE (PRESSURE THERPOY)
-
दामिनी – DAAMINEE (LIGHTNING)
पूर्ण चंद्र रात शीत गात गात चालली नाव वल्हवीत गीत गात गात चालली चंचला हवा परी झुळूक मुग्ध लाजरी अंतरी भरून प्रीत गात गात चालली संगमी मुळामुठेत नाचण्यास नर्तिका वीज आग पाखडीत गात गात चालली डोंगरी धबाबत्या जलात मस्त दामिनी कातळा करून चीत गात गात चालली चांदणे दुधासमान सांडता धरेवरी ओंजळी निशा भरीत गात गात…
-
फुलबाजार – FULBAJAR (FLOWER MARKET)
दुर्लक्षित ना ना व्यापारी, घाणेरी निवडुंग रुई खुलते झुलते घरात दारी काटेरी निवडुंग रुई जिथे बालके रोगी दुबळी रोजच मरती तिथे तिथे लसी टोचण्या करिती वारी बाणेरी निवडुंग रुई तल्लख करुनी घ्राणेंद्रियांस घाणेरीच्या फुलांसवे झुरळे माश्या मच्छर मारी सोनेरी निवडुंग रुई झेंडू शेवंतीच्या संगे वाड्यामधुनी सासरच्या येतीजाती फुलबाजारी माहेरी निवडुंग रुई दीपोत्सव भूवरती येता दिवे…
-
आम्रकुष्मांडी – AMRA KUSHMANDI (PROTECTIVE GUARDIAN OF NEMINATH TIRTHANKAR)
आम्रकुष्मांडी दिपाणी कुष्मांडीनी टांकसाळी पाड नाणी कुष्मांडीनी आम्रकुष्मांडी कमानी कुष्मांडीनी खोदते झोकात खाणी कुष्मांडीनी आम्रकुष्मांडी दिवाणी कुष्मांडीनी परजते तलवार राणी कुष्मांडीनी आम्रकुष्मांडी शहाणी कुष्मांडीनी गातसे कैफात गाणी कुष्मांडीनी आम्रकुष्मांडी भवानी कुष्मांडीनी कृष्णवर्णी दिव्य बाणी कुष्मांडीनी गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २२) लगावली – गालगागा/ २ वेळा गागा/ ४ वेळा