-
नेणिवेची चारुता (THE BEAUTY OF SUBCONSCIOUS)
जाणिवेची जागृती मम नेणिवेची चारुता मजजवळ सौंदर्यदृष्टी आत्मियाची शुद्धता गातसे सौंदर्य माझे वाहते गात्रातुनी मी फिदा माझ्यावरी मज शोभणारी मुग्धता पाहशी तू मजकडे अन मी तुझी होतेच रे मौन तू घेशी जरी रे जाणते मी रम्यता रोखुनी मी पाहते अन गाळुनी मी ऐकते बोलते मी नेमके अन जाणते तव सौम्यता जोडले नाते मनाने भूतकाळा जाणण्या…
-
परमाणू – ATOM
सूक्ष्मपणा पर्याय तिसरा पुदगल द्रव्याचा सूक्ष्मपणाचे प्रकार दोन समजुन घे त्यांना सर्वात सूक्ष्म बघ परमाणू उदाहरण हेच प्रकार पहिला हाच असे ना कसलाही पेच दुजा असे आपेक्षिक सूक्ष्म अपेक्षेने जाण अपेक्षेस तू नच म्हण तुलना हा तर स्याद्वाद पेरूहुनही सूक्ष्म चेरी चेरीहुन ओवा ओव्याहुनही सूक्ष्म त्याला जलद जलद शोधा पुदगल द्रव्याच्या तिसऱ्या पर्यायाला जाण पुदगल…
-
बंध पर्याय – BANDH PARYAAY
पुदगल द्रव्याच्या पर्यायी असती एकुण दहा त्यातिल दुसऱ्या पर्यायीला म्हणती बंध पहा स्वाभाविक प्रायोगिक हे बंधाचे दो विभाग वैस्रसिक हे स्वाभाविकचे आहे दुसरे नाव वीज ढग नि इंद्रधनु वैस्रसिक बंधात येतात पुरुष प्रयत्नाविनाच घडे हा स्वाभाविक बंध प्रायोगिक जो पुरुष प्रयत्ने त्याचे दो प्रकार एक अजीवाचा बंध दुजा जीव-अजीव बंध लाकूड लाखेचा बंध हा अजीवाचा…
-
सुजला सुफला – SUJALA SUFALA
माय मराठी प्राणाहुन प्रिय मरहट्टे जन गर्जा जय जय कुंडलिका अन नीरा पवना मुळा मुठा वारणा कोयना महाराष्ट्र मम सुजला सुफला शिवबा शंभू जेथे लढला कभिन्न कातळ फोडित पत्थर स्वच्छ जले झुळझुळती निर्झर ज्ञानदेव नामा तुकयाची अभंग गाथा ओवी साची पुणे मुंबई मावळ डगरी खऱ्या शोभती उद्यम नगरी वाऱ्या वाऱ्या घुमव बासरी ओत काव्यजल भरुन…
-
जन्मसाल – JANM SAAL (BIRTH YEAR)
-
गझलानंद – GAZALAANAND
त्रिशंकुची चार टोके, असतिल ज्याच्या पृष्ठावरती, अशा गोलकाच्या मी केंद्री, झुकविन माथा अनंत वेळा! अविनाशी आत्मियाशी, भांडुन तंटुन थकल्यावरती, शांत मनाने बसेन तुझिया, चरणी नाथा अनंत वेळा! ढोल तबला सुरपेटी, हीच साधने ग्रामजनांच्या, देइन हाती मैत्री करण्या, सूर ताल अन लय शब्दांशी; नृत्य संगीत शिकाया, बडवित टिपरी टिपरीवरती, ऐकत राहिन आत आतला, तै तै था…
-
शहारे – SHAHAARE
आठवले मज वेडे सारे पुष्प-सुगंधित झाले वारे पापण काठी मौनी अश्रू नकळत त्यांचे बनले तारे मुग्ध मधुर ते रूप परंतू मम नेत्रांवर सक्त पहारे भेटायाला उत्सुक कोणी म्हणुनी जपले क्षण मी खारे माझ्या इच्छा दवबिंदूसम पुण्य असे जणू तप्त निखारे वाजविण्या मन तबला सुंदर काया पिटते ढोल नगारे प्रेम खरे पण रंग बघाया बदलत गेले…