-
भरीव – BHAREEV
जीवन सुंदर अतीव आहे मनात मंदिर वसलेले जीवन सुंदर सजीव आहे मनात मंदिर वसलेले पहाट वारा वाहत नाचे फुले उमलली बनी वनी जीवन सुंदर घडीव आहे मनात मंदिर वसलेले भीती चिंता पोकळ साऱ्या तमात रात्री विरलेल्या जीवन सुंदर भरीव आहे मनात मंदिर वसलेले कोमल प्रमुदित भावफुलांचे सुगंध भरता मम हृदयी जीवन सुंदर वळीव आहे मनात…
-
काळ्या काळया – KAALHYAA KAALHYAA
काळ्या काळया विठोबाला दंडवत माझा काळया काळया उजेडाला गंडवत माझा नमस्कार हातांची दो घडी घालुनीया काळ्या काळया रखुमाईस बंडवत माझा मोक्ष मिळायाला केला सत्याचा प्रयोग काळ्या काळ्या कायेवरी भंडवत माझा जीव मौनी अभय होण्या भव्य राजवाडा काळ्या काळ्या शासकांना फंडवत माझा पाहतेय श्रद्धेने मी मूर्त रूप आत्मा काळया काळया पाषाणात खंडवत माझा गझल मात्रावृत्त (मात्रा…
-
आर्या – AARYAA
हंसगती शुभ आर्या सिंहगती सैनिकी सबल आर्या गजगामिनी सुंदरी सर्पिणी जणू कुरळ आर्या निज आत्म्यात रमाया अक्षरी लीन ब्राम्हीसम आर्या वाग्देवीने अंकित नागीण कृष्ण सरळ आर्या अष्टद्रव्य अर्पिण्यास चालली मानिनी श्यामल आर्या जिनबिंब दर्शनाने अंतरी धन्य सजल आर्या
-
टकाटक – TAKAATAK
बाया बापे बनुन टकाटक आले लावण करावयाला चिखलामधली रोपे उचलत पावसात तनु भिजावयाला इरली डोईवरती त्यांच्या रंगबिरंगी किलतानाची कधी न वाटे भीति तयांना अस्मानीच्या सुलतानाची शेतामध्ये उभ्या आडव्या करून ओळी अंतर राखत धारांमध्ये न्हात कुणबिणी गाती गाणी रोपे लावत हरेक तरुला वाढायाला जागा मिळुदे डुलावयाला प्रकाश पाणी यांच्यासंगे वारा मिळुदे डुलावयाला वेगे वेगे उंचच जावे…
-
नमिते – NAMITE
मी जे लिहिते त्यातुन सुंदर सारे निघते मी जे जपते त्यातुन सुंदर सारे निघते घास टाकुनी जात्यामध्ये भरून ओंजळ मी जे दळते त्यातुन सुंदर सारे निघते जीवांना रक्षाया अविरत सत्य जाणुनी मी जे रचते त्यातुन सुंदर सारे निघते गोष्टींमधुनी विचार शिवरुप मनी मुलांच्या मी जे भरते त्यातुन सुंदर सारे निघते ब्रह्मांडातिल अन सृष्टीतिल मम पिंडातिल…
-
विठ्ठल – VITHTHAL
सूर मुरलीचे निळ्याचे गुंजले रानात साऱ्या ताल तबल्याचे घनाचे रंगले रानात साऱ्या सावळ्या या विठ्ठलाचे रूप सुंदर भावलेले पाहुनी वेडावले जन नाचले रानात साऱ्या
-
ठिपके – THIPAKE
कुरणांवरती मेंढ्या फिरती ओढ्याकाठी गळ्यातल्या घंटा किणकिणती ओढ्याकाठी निळ्या पर्वती प्रभा पसरली उजळत माथे इवले इवले ठिपके चरती ओढ्याकाठी कुठे बैसला मेंढपाळ वाजवीत पावा मऊ घोंगडे खांद्यावरती ओढ्याकाठी गवतावर फुलपाखरे जांभळ्या पंखांची पंख झुलवुनी मजेत उडती ओढ्याकाठी खळाळते जल त्या तालावर वारा गाई काठावर मासोळ्या दिसती ओढ्याकाठी गझल मात्रावृत्त – (मात्रा २४)