Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • गणपती येत आहे – GANAPATEE YET AAHE (lord ganesh is arriving)

    गणपती येत आहे ताट भरा मोदकाचे लवकरी लवकरी गणपती येत आहे वसन नेस नऊवारी भरजरी लवकरी तबकात अष्टद्रव्ये लख्ख पीत ताबाणात फुले रचु तांबडी गणपती येत आहे आरतीस जमा सारे मम् घरी लवकरी ढग शुभ्र आभाळात दाटलेत कोमलांगी नाचरे सावळे गणपती येत आहे निळ्या नभा चुंबायास बन परी लवकरी वन हरित भादव्याला सोनपात केवड्याची सुवासिक…

    September 5, 2016
  • सहस्त्रदलयुत जिननाम – SAHASTRA DALAYUT JIN NAAM (The name of the jina(Lord jinendra)which is accompanied by thouand petals)

    पर्वराज पर्युषण येता दशधर्मांना जपू अंतरी निसर्गातला धर्म अहिंसा स्वधर्म मानुन बघू अंतरी ज्या धरणीवर जगतो मरतो तिलाच आपण दूषित करतो त्या पृथ्वीचा धर्म क्षमेचा निष्ठेने आचरू अंतरी आत्म्यामधले मार्दव अपुल्या जगात साऱ्या कोमल असते प्रेमभाव जीवांप्रति तैसे प्रेम पेरुया मृदू अंतरी मन वचने कायेत सरळपण याला आर्जव जैनी म्हणती कृतीत येण्या आर्जव सहजी मुनीमनासम…

    September 3, 2016
  • बियाणे – BIYAANE (seeds)

    पिकवीन सोनं मी गझलेच्या जमिनीमंदी झिजवीन जोडं मी गझलेच्या जमिनीमंदी रचून पोती शब्दधनाची येता गाडी अडवीन गाडं मी गझलेच्या जमिनीमंदी पेरायाला नक्षत्रांचे खरे बियाणे उसवीन पोतं मी गझलेच्या जमिनीमंदी प्रीती भक्ती शक्ती माझी सफल व्हावया उधळीन दाणं मी गझलेच्या जमिनीमंदी पाडायाला सरी मोतिया रिमझिम झिमझिम बसवीन जातं मी गझलेच्या जमिनीमंदी

    September 2, 2016
  • मंझिल – MANZIL (destination)

    शब्द माझे सारथी अन शब्द माझे धन खरे हे शब्द माझे सारथी अन शब्द माझे बल खरे हे स्वच्छ करण्या मार्ग माझा हृदय माझे बिघडलेले शब्द माझे सारथी अन शब्द माझे जल खरे हे भेदण्या लक्ष्यास अवघड गाठण्या मंझिल नव्याने शब्द माझे सारथी अन शब्द माझे शर खरे हे चुंबण्या आकाशगंगा डुंबण्या पाण्यात निळसर शब्द…

    September 2, 2016
  • भगवती – BHAGAVATEE (possessing fortune majesty)

    घनतमी किती या संहार जाहला जरी प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी मन खरे मला हे सांगून सांगून बघे भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी झरणार शब्द घन दाटून येता हृदये श्रावणी धनाची लयलूट करूया हरी मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)

    August 31, 2016
  • कुकडी – KUKADEE (name of river)

    सजग जाहला ना मोहरला अजिंक्य ठरला भरला प्याला सरळ सरळ जाहल्यावरी तू प्यावा सरला भरला प्याला पात्रामधला नाद सुरे ऐकत थरथरला भरला प्याला ओतत ओतत जलास कोणी म्हणते झरला भरला प्याला अंतर्यामी तुझ्या नि माझ्या मूर्त साजिरी डुलते आहे अंतरातल्या जलास निर्मल भरून भरला भरला प्याला चिखलामधल्या कमळी फसला उदक शिंपुनी पवित्र झाला झळाळणाऱ्या मृगनीरावर…

    August 30, 2016
  • तुला – TULA (weighing scale)

    तीन शेरांचे मुक्तक … माग यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते माग शोधुनी काढायाला पी जे मनास वाटे ते चिखलामधले अगणित काटे दंश कराया टपलेले माग त्यातुनी काढायाला पी जे मनास वाटे ते भरला प्याला सांडूदे तव भिजण्या सारे शेर तुझे माग वाचुनी काढायाला पी जे मनास वाटे ते दोन शेरांचे स्वर काफिया मुक्तक……

    August 29, 2016
←Previous Page
1 … 125 126 127 128 129 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya