-
भांडू नये कुणाशी – “One should not quarrel with anyone”
भांडू नये कुणाशी कळते तरी न वळते भांडायला न कोणी तेव्हा स्वतःस पिळते सारेच गोडबोले कंटाळले पुरी मी भांडायला अताशा कोणी कसे न मिळते? स्पर्धाच घेउयाका भांडायची कुणाशी टिकणार मीच खमकी ना मी मधून पळते भांडायचे कशाला कोणी म्हणू नये रे त्याची मजा लुटे जो त्यालाच फक्त कळते मनसोक्त दाद देते कद्रूपणा न करते जो…
-
माझ्यावरी फिदा ही – “She is crazy about me”
माझ्यावरी फिदा ही माझी गझल दिवाणी ती तोलते मलाही आहे किती शहाणी मी पाझरे अताशा हलक्याच चाहुलीने हृदयात अमृताच्या आहेत कैक खाणी दचकून जाग आता मजला कधी न येते असते सदैव जागी माझ्यात एक राणी अफवाच पेरती ते त्यांचेच पीक घेती असली पिके विकाया लिहितात ते कहाणी माझी-तुझ्यातली ही प्रीतीच तारणारी गोष्टीतुनी खळाळे मम प्रेमरूप…
-
श्रमण – An ascetic
पूर्व प्रसिद्धी -मासिक महापुरुष, दीपावली विशेषांक, वर्ष ८वे, पुष्प १-२, ऑक्टोबर- नोव्हेंबर, २०१४ श्रमात रमती मनापासुनी जे जे त्यांना श्रमण म्हणावे, वीज बनविण्या साठविती जल म्हणून त्यांना धरण म्हणावे। वीज खेळवित तनामनातुन भावांचे नित मंथन करुनी, हृदयजली जिनबिंब पाहती त्यांना ब्राम्हण रमण म्हणावे। तीर्थंकर वाणीतिल कणकण टिपण्यासाठी धर्मसभा जी, बारा भागांमध्ये शोभीत तिजला समवशरण म्हणावे।…
-
गगनाला चुंबुन आले – Achieving extraordinary success
गगनाला चुंबुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये सीतेला भेटुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये तंबोरा लावित होती पण मजला पाहुन हसली तिजसंगे गाउन आले सोळाव्या स्वप्नामध्ये केशरी फुलांच्या बागा बागेत झुल्यावर हसऱ्या रामाला पाहुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये मंदिरी देव नी देवी अन हवेलीतले वारे त्या मरुता प्राशुन आले सोळाव्या स्वप्नामध्ये जलदातुन शीतल सुरभित गंधोदक वर्षत होते पावसात नाचुन आले…
-
तू सोन्याची पुतळी मृदुले – O tender gentle girl.. You are a figurine of gold !”
तू सोन्याची पुतळी मृदुले कंठसाज वर गजरे झुकले अंगठीतले खडे दावती तव नयनांतिल बिंब चंचले तुझ्या अंगुली बोलत असता गोठ पाटल्या बिलवर भिजले दंडी वाक्या रुतून बसल्या गौर भाल बिन्दीने सजले कमर मेखला कनक कळ्यांची तुला वेढुनी बसली गझले फलंदाज हा धुरळा पाडे मोजुन धावा यंत्र मोडले त्रिफळा उडवत उसळत चेंडू परिघाच्या बाहेर सटकले रंगसंगती…
