तू सोन्याची पुतळी मृदुले – TOO SONYAACHEE PUTALEE MRUDULE


तू सोन्याची पुतळी मृदुले
कंठसाज वर गजरे झुकले

अंगठीतले खडे दावती
तव नयनांतिल बिंब चंचले

तुझ्या अंगुली बोलत असता
गोठ पाटल्या बिलवर भिजले

दंडी वाक्या रुतून बसल्या
गौर भाल बिन्दीने सजले

कमर मेखला कनक कळ्यांची
तुला वेढुनी बसली गझले

फलंदाज तव धुरळा पाडे
मोजुन धावा यंत्र मोडले

त्रिफळा उडवत उसळत चेंडू
परिघाच्या बाहेर सटकले

रंगसंगती जून फुलांची
बघून नवखे मागे सरले

मैफल फुलपाखरी दुपारी
भुंग्यांनी वारुळ पोखरले

टाके घालत उसवत पुन्हा
पाकळ्यांतले सुगंध भरले

गाजवला तू स्वधर्म सुंदर
दृष्ट काढण्या अंबर झुकले

गझल (८+८ = १६ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.