Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • मैफल – MAIFAL

    हे पोलके झाले जुने टाकून देना साजणे आणेन चोळी जांभळी कशिदा तुझा तू रेखणे ये राहण्या माझ्या घरी हिंडू फिरू पाहू पुणे भरवूत मैफल गझलची येतील दर्दी पाहुणे आता सुनेत्रा बासना गझलेस पाणी पाजणे वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/

    October 16, 2014
  • भार्या – wife

    संपेल आता जाळणे अन प्रीत सुंदर टाळणे ढग डोंगरी पाणी झरे आणू कशाला गाळणे रंगून सुकले रंगही आता पुरे हे वाळणे येता समीप मधुघटिका शंकेस का या पाळणे आनंद मोदे विहरतो डोळे नको मग गाळणे भार्या खरी तव सुंदरी परकीवरी का भाळणे वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा…

    October 16, 2014
  • धरा – Earth

    वचनास मम जागावया गाते शिरा तानोनिया कोठून त्याही उगवल्या फुकटातले लाटावया माझीच ही आहे धरा दासी न ही तुडवावया घाटात कोणी टाकला तो कांब मज पाडावया चल संगती माझ्या अता तो हात हाती घ्यावया डोक्यावरी ना बैसले बसले इथे रक्षावया वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/

    October 16, 2014
  • व्यवहार – conduct

    कोणास ना बोले कुणी पण बोलते हृदयातुनी व्यवहार जो जाणे खरा तो निश्चयी आहे गुणी मी काफियाने बांधली कविताच ती होती जुनी जेव्हा तिला तू डिवचले ती बोलली फुत्कारुनी हे वृत्त आहे बेरकी अन गझल माझी देखणी वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/

    October 16, 2014
  • सल्लेखना – SALLEKHANAA

    चल घे अता सल्लेखना अन आत्महत्या टाळना फासे उगा फेकू नको असते जुगारी वासना आता पुरे हे पूजने त्यांच्यात काही राम ना खोट्याच त्यांच्या घोषणा माझी खरी ही साधना काहूर उठता अंतरी मौनात केला सामना जमलेच ना मज टाळणे शिव सत्य सुंदर भावना वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा गा ल गा/ गा…

    October 15, 2014
  • रांगडी – crude

    आलेच ते बघ गावया खोटे मढे उचलावया भित्री कधी नव्हतेच मी त्या नाटक्यांना भ्यावया मतदान मी केले खरे सरकार माझे यावया का घाबरे ती मासळी पाण्यात या उतरावया हे चाहते आले नवे गझलेत माझ्या न्हावया आहे सुनेत्रा रांगडी दगडांस त्या फोडावया त्यांनीच केले लंगडे फुकटात कुबड्या द्यावया वृत्त – संयुत, मात्रा १४ लगावली – गा…

    October 15, 2014
  • काय झाले – what did I become

    मी काय होते काय झाले भलतीच हाय नि फाय झाले सांभाळण्या ही गझल माझी मी भांडणारी माय झाले होते जरी मी देवमाता का मारकूटी गाय झाले मी मस्तकी होते जरी तव तुज चालवाया पाय झाले मी दुग्धगंगा वाहणारी तापून हलके साय झाले वृत्त – अक्षरगण वृत्त, मात्रा १६ लगावली – गा गा ल गा/ गा…

    October 15, 2014
←Previous Page
1 … 184 185 186 187 188 … 289
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya