-
रेन एणाराय – RAIN ENAARAAY
येणार हाय एणाराय पाऊस येणार हाय रेन एणाराय झिमझिम सरींनी अंगण भिजणाराय कधी काळी जमिनीत पेरलेलं बी बियाणं बोलू लागणाराय अंकुरातून अक्षर अक्षर मान वर उंच करणाराय अक्षर अक्षर चढत वर शब्द सुंदर दिसू लागणाराय नाजुक पोपटी पानांवर शब्द शब्द बरसू लागणाराय शब्दांचीच पानं होणाराय पानांचेच शब्द होणाराय पानं पानं जोडून जोडून डहाळी डहाळी डूलणाराय…
-
खरेपणा – KHAREPANAA
मुक्त जाहले जीव सर्व हे आज सुखाचा दिवस खरा सर्व जिवांचा धर्म अहिंसा खरेपणा हा मंत्र बरा जीवासाठी जीव जपूया प्रेमासाठी प्रेम जपू हृदयामधला ईश्वर दिसण्या प्रत्येकातील मूल जपू पूर्ण कराया तरुणांच्या अन बालांच्याही इच्छांना वृद्धत्वातील बाल्य जपूया बाल्यामधल्या मोदांना नको वाटते कर्मकांड तर उखडुन टाका मनातुनी दिसेल तुम्हा आत्म्यातिल इश नित्य उमलत्या फुलातुनी उडा…
-
बात खरी – BAAT KHAREE
स्वभाव जुळता दोन जीवांचे जुळे कुंडली आपसूक विचार जुळता दोन घरांचे जुळे कुंडली आपसूक मानपान अन देणेघेणे देऊ फाटा साऱ्यांना देवापुढती झुकवुन माथा अर्थ देउया नात्यांना बाह्यरूप अन पैशाहुनही महत्त्व आहे प्रेमाला दोघांमध्ये लुडबुड करण्या नकोच संधी पाप्यांना प्रामाणिक राहूनच टिकवा नात्यांमधला नवेपणा स्वाभीमानी जीवन जगण्या ताठ राहुद्या नित्य कणा अंतर मिटवा अंतरातले जपा अंतरी…
